lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज

पोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज

पोस्टात अनेक प्रकारच्या योजना आहेत. ज्या नागरिकांना जास्तीचा फायदा मिळवून देतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:42 AM2018-09-24T11:42:09+5:302018-09-24T11:50:45+5:30

पोस्टात अनेक प्रकारच्या योजना आहेत. ज्या नागरिकांना जास्तीचा फायदा मिळवून देतात.

top9 post office saving schemes that offer 6.6 to 8.3 percent interest rate | पोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज

पोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज

नवी दिल्ली- पोस्टात अनेक प्रकारच्या योजना आहेत. ज्या नागरिकांना जास्तीचा फायदा मिळवून देतात. पोस्ट ऑफिस हे सरकारच्या अखत्यारित असल्यानं गुंतवणूकदारांच्या पैशांचीही हमी देते. विशेष म्हणजे पोस्टात तुम्ही वेगवेगळ्या सरकारी योजनांतर्गत खाती उघडू शकता. या योजनाही तुम्हाला चांगलं व्याज मिळवून देतात.
अशाच 9 योजना या पोस्टात उघडल्या जातात. पोस्ट ऑफिस तुम्हाला बचत खात्यावर 4 टक्क्यांपासून 8.3 टक्क्यांपर्यंत व्याज देते. या योजनांमध्ये पोस्टाचं बचत खातं, मुदत ठेव, पोस्टाची मासिक उत्पन्न योजना, वरिष्ठ नागरिक बचत योजना, 15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं(पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र(केवीपी) आणि सुकन्या समृद्धी खात्यांचा समावेश आहे.
दररोज 55 रुपये वाचवून काढा 10 लाखांचा विमा, पोस्टाची सुपरहिट योजना
10 रुपये गुंतवा आणि कमवा भरघोस नफा, पोस्टाची जबरदस्त योजना

  • पोस्टाची मुदत ठेव- पोस्टात तुम्ही चार प्रकारे ठेवी ठेवू शकता. एक वर्ष, दोन वर्षं, तीन वर्षं आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. एक वर्षातील मुदत ठेवीवर 6.6 टक्के व्याज मिळतं, तर दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.7 टक्के व्याज मिळतं. तीन वर्षीय पोस्टाच्या ठेवींवर 6.9 टक्के व्याज दिलं जातं. तर पाच वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवर 7.4 टक्के व्याज मिळतं. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी ठेवलेल्या ठेवींवर प्राप्तिकर कायदा 80 सीअंतर्गत सूटही दिली जाते. त्यामुळे या पैशांवर कोणताही कर लागत नाही. 
  • आरडी- पोस्टात तुम्ही प्रतिमहिना 10 रुपये गुंतवणूक करून आरडी काढू शकता. या खात्यात जमा असलेल्या रकमेवर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळतं. या बचत योजनेंतर्गत एका वर्षांनंतर तुम्ही 50 टक्के रक्कम काढू शकता.  
  • पोस्टाची मासिक उत्पन्न योजना- यात कोणतीही व्यक्ती खातं उघडू शकतो. या खात्यात जमा असलेल्या रकमेवर 7.3 टक्के व्याज दिलं जातं. ज्यात जास्त करून 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. या खात्यातील पैशांचं हस्तांतरणही करता येते.  
  • किसान विकास पत्र (केवीपी): या खात्यातील जमा रक्कम अडीच वर्षांनंतर काढता येते. या रकमेवर तुम्हाला 7.3 टक्के वर्षाला व्याज मिळतं. यात गुंतवलेली रक्कम 118 महिन्यानंतर(9 वर्षं आणि 10 महिने) दुप्पट होते. 
  • 15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं(पीपीएफ)- पीपीएफचं खातं तुम्हाला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यात आर्थिक वर्षामध्ये एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर लाभ मिळतो. यातील जमा रकमेवर 7.6 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी आहे. यात तुम्ही संयुक्त अकाऊंटही उघडू शकता.

पोस्टाची नवी योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळणार जबरदस्त नफा
पोस्टाच्या 'या' तीन योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास मिळणार चौपट नफा, जाणून घ्या कसे गुंतवाल पैसे ?

  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत वर्षाला 7.0 टक्के व्याज मिळतं. तसेच 100 रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम गुंतवू शकता. तत्पूर्वी या योजनेत गुंतवणूक केल्यावर वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होतं. 
  • सुकन्या समृद्धी योजना- या खात्यात आर्थिक वर्षात 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. हे खातं मुलगी जन्माला आल्यानंतर 10 वर्षांत उघडता येते. या खात्यातील जमा रकमेवर 8.5 टक्के व्याज मिळतं. मुलीला 21 वर्षं पूर्ण झाल्यानंतर हे खातं बंद केलं जातं. 

Web Title: top9 post office saving schemes that offer 6.6 to 8.3 percent interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.