Mumbai Airport News: देशातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईविमानतळावरून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतर्देशीय विमातळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १६ मे म्हणजेच आजपासून विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना युजर शुल्क म्हणून ६९५ रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागेल. विमानतळ शुल्क नियामकानंऑपरेटरना शुल्कात बदल करण्याची परवानगी दिली आहे.
एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं (AERA) १६ मे २०२५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीसाठी यूडीएफचे सुधारित दर निश्चित केले आहेत. यापूर्वी ऑगस्ट २०२४ पर्यंत मुंबई विमानतळावरून प्रस्थानासाठी १२० रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी १८७ रुपये शुल्क आकारलं जात होते.
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
किती असेल शुल्क?
वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासच्या प्रवशांसाठी हे शुल्क वेगवेगळं असेल. इकॉनॉमी क्लासनं आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क ६१५ रुपये करण्यात आलं आहे. तर बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क ६९५ रुपये करण्यात आलंय. तर आंतरराष्ट्रीय मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना म्हणजेच अरायव्हलवर बिझनेस क्लाससाठी ३०४ रुपये आणि इकॉनॉमी क्लाससाठी २६० रुपये शुल्क द्यावं लागेल. तर आंतर्देशीय प्रवशांना डिपार्चरवर १७५ रुपये आणि अरायव्हलवर ७५ रुपये शुल्क द्यावं लागेल. देशातील प्रमुख विमानतळांसाठी सर्व शुल्क निश्चित करण्याचा अधिकार एअरपोर्ट्स इकॉनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाला (AERA)आहे.
दरम्यान विमान कंपन्यांसाठी लँडिंग आणि पार्किंग शुल्क देखील कमी करण्यात आलंय. समान विमानतळांवरील स्पर्धात्मक विमानतळ शुल्क लक्षात घेऊन ते वाजवी पातळीवर ठेवण्यात आलंय. नियामकानं म्हटल्यानुसार या दर सुधारणेमुळे विमान वाहतूक ऑपरेशन्सवर अनावश्यक भार पडणार नाही आणि ऑपरेशनल कार्यक्षमता राखली जाईल याची खात्री होते.
३५ लाख प्रवासी करतात प्रवास
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळ हे अदानी समूहाच्या नेतृत्वाखालील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडद्वारे (MIAL) चालवलं जातं. हे विमानतळ दरवर्षी ३५ लाख किंवा त्याहून अधिक प्रवाशांना सेवा देतं. हे प्रमुख विमानतळांच्या श्रेणीत येतं.