lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला! एकाच वेळी मिळणार आनंदाच्या बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला! एकाच वेळी मिळणार आनंदाच्या बातम्या

31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. यामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रविवारी, 31 मार्च रोजीही बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 04:01 PM2024-03-24T16:01:08+5:302024-03-24T16:02:28+5:30

31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. यामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रविवारी, 31 मार्च रोजीही बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

The real Holi of central employees on March 30! Happy news will come at the same time | केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला! एकाच वेळी मिळणार आनंदाच्या बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला! एकाच वेळी मिळणार आनंदाच्या बातम्या

संपूर्ण देशभरात होळीचा उत्सव अत्यंत आनंदात साजरा केला जातो. यावेळी हा उत्सव 25 मार्चला होत आहे. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला होणार आहे. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार यावेळी 30 मार्चपर्यंत होणार असून यात मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. खरे तर, 31 मार्चला रविवार असल्याने कर्मचाऱ्यांचा वाढलेला पगार 30 मार्चलाच येऊ शकतो. 31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. यामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रविवारी, 31 मार्च रोजीही बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

...म्हणून वाढून येणार पगार -
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किंवा डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा भत्ता आता 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या जानेवारीपासून याची अंमलबजावणी झाली आहे, त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे एरियरही मिळेल.

एचआरएही वाढणार - 
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचल्याने घरभाडे भत्ता अर्थात एचआरएमध्येही वाढ झाली आहे. शहराच्या श्रेणीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 टक्क्यांपर्यंत एचआरए मिळेल. याशिवाय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगारात इतर भत्तेही जोडले जातील.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 50 टक्के  झाल्याने, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा चाइल्डकेअर स्पेशल अलाउन्स, चाइल्ड एज्युकेशन अलाउंस, हॉस्टेल सब्सिडी, ट्रांसफरवर ट्रॅव्हल अलाउंस, ड्रेस अलाउंस, ग्रेच्युटी सीलिंग, मायलेज अलाउंसमध्येही वाढ झाली आहे. हे  सर्व अलाउन्स, क्लेमकेल्यानंतर मिळतात.
 

Web Title: The real Holi of central employees on March 30! Happy news will come at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.