lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च ५ वर्षांत दुप्पट

देशात उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च ५ वर्षांत दुप्पट

भारतातील उपचारांचा महागाई दर आशियातील सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे औषधांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:46 AM2023-11-24T11:46:27+5:302023-11-24T11:47:22+5:30

भारतातील उपचारांचा महागाई दर आशियातील सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे औषधांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

The cost of treatment in the country increased drastically the cost of hospitalization doubled in 5 years know details insurance Mediclaim | देशात उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च ५ वर्षांत दुप्पट

देशात उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च ५ वर्षांत दुप्पट

भारतातील उपचारांचा महागाई दर आशियातील सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील उपचाराचा खर्च आता १४ टक्क्यांवर पोहोचलाय. दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये पाच वर्षांत संसर्गजन्य रोगांचा खर्च दुपटीनं वाढलाय. तर दुसरीकडे इतर गंभीर आजारांचा खर्चही वाढलाय. इन्शुरटेक कंपनी प्लमच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये याचा खुलासा करण्यात आलाय.

अहवालात असं म्हटलंय की उपचारांच्या खर्चाचा परिणाम नऊ कोटींहून अधिक लोकांवर होत आहे आणि त्याचा खर्च त्यांच्या एकूण खर्चाच्या १० टक्क्यांहून अधिक झाला आहे. उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक बोजाही वाढलाय. यापैकी ७१ टक्के लोक त्यांच्या आरोग्यावरील खर्चासाठी वैयक्तिकरित्या आरोग्य विमा घेतात.

पाच वर्षांत खर्च दुप्पट
गेल्या पाच वर्षांमध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर येणाऱ्या खर्चात दुपटीनं वाढ झालीये. संसर्गजन्य आजा आणि श्वसनाशी निगडीत आजारांसाठीचे विमा क्लेम तेजीनं वाढले आहे. आकडेवारीनुसार संसर्गजन्य आजारांच्या उपचारासाठी २०१८ मध्ये सरासरी विमा क्लेम २४,५६९ रुपये होता. जो आता वाढून ६४,१३५ रुपयांपर्यंत पोहोचला. 

कोरोनानंतर तेजी
कोरोना महासाथीनंतर उपाचराच्या खर्चात तेजीनं वाढ झाली आहे. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंच्या खर्चातही वाढ झाली आहे. यापूर्वी या वस्तूंचा खर्च ३ ते ४ टक्के होता. तो आता वाढून १५ टक्क्यांपर्यंत गेलाय. आरोग्य विम्याच्या मागणीतील तेजीमुळे उपचारही महागलेत.
तर दुसरीकडे आरोग्य विम्याचा प्रीमिअमही वाढलाय. वर्षभरात यात १० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. उपचारासाचे खर्च आणि विमा क्लेम वाढत आहेत. असात प्रीमिअम वाढवणं हा आमचा नाईलाज असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे.

औषधांचे दर किती वाढले
रिपोर्टनुसार गेल्या ३ ते ४ वर्षांमध्ये शेड्युल्ड औषधांच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. औषधांच्या किंमती वाढण्याचं सत्र कोरोनाच्या महासाथीनंतर सुरू झालं. तर नॉन शेड्युल्ड औषधांच्या किंमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ झालीये.

कॅन्सरवर वर्षाला ३.३ लाख रुपयांचा खर्च
भारतात कर्करोगाचा रुग्ण आपल्या उपचारावर वर्षाला ३.३१ लाख रुपये खर्च करतो. देशातील प्रमुख रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १२१४८ कर्करोगग्रस्तांच्या या दरम्यान करण्यात आलेल्या अभ्यासावरून हा अंदाज वर्तवण्यात आलाय. या वर्षी जून महिन्यात फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये रिपोर्ट प्रकाशित झाला होता. दिल्ली, चंडीगड, आणि टाटा मेमोरियल सेंटर मुंबईतील रुग्णांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. 

Web Title: The cost of treatment in the country increased drastically the cost of hospitalization doubled in 5 years know details insurance Mediclaim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.