lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताला कवेत घेतले, आता 'आशिया' पादाक्रांत करायला निघाली 'टाटा'

भारताला कवेत घेतले, आता 'आशिया' पादाक्रांत करायला निघाली 'टाटा'

यापूर्वी टाटा समुहानं एअर इंडियाचं केलं होतं अधिग्रहण.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 03:56 PM2022-04-27T15:56:50+5:302022-04-27T15:57:09+5:30

यापूर्वी टाटा समुहानं एअर इंडियाचं केलं होतं अधिग्रहण.

Tata Group approaches CCI for merger between Air India and AirAsia India | भारताला कवेत घेतले, आता 'आशिया' पादाक्रांत करायला निघाली 'टाटा'

भारताला कवेत घेतले, आता 'आशिया' पादाक्रांत करायला निघाली 'टाटा'

टाटांचं स्वामित्व असलेल्या एअर इंडियानं (Air India) स्वस्त विमान सेवा पुरवणाऱ्या एअर एशियाच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावित व्यवहारासाठी कंपनीनं सीसीआयकडून मंजुरीदेखील मागितली आहे.

दरम्यान, एका निश्चित मर्यादेपेक्षा अधिक भागीदारीचा व्यवसाय असल्यास त्यासाठी सीसीआयची मंजुरी घेणं आवश्यक आहे. प्रस्तावित व्यवहारामुळे स्पर्धात्मक दृष्टीनं बदलणार नाही किंवा भारतातील स्पर्धेवर कोणताही महत्त्वपूर्ण प्रतिकूल परिणाम होणार नाही. एअर एशियाचा भारतात ८३.६७ टक्के हिसा टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आणि उर्वरित हिस्सा एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकडे (एएआयएल) आहे. हा मलेशियाच्या एअर एशियाचा समुहाचा एक भाग आहे.

एअर इंडिया आणि त्यांची सहाय्यक कंपनी एअर इंडिया एक्स्प्रेसचं गेल्या वर्षी टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण स्वामित्व असलेली कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेनं अधिग्रहण केलं होतं. आता टाटांची एअरलाईन्स एअर इंडियानं एअर एशियाचा संपूर्ण हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय टाटा सिंगापूर एअरलाईन्ससोबत संयुक्त उपक्रमात एक पूर्ण विमान सेवेची सुविधाही पुरवत आहे. 

एअर एशियाबद्दल सांगायचं झालं तर एअरलाइन्सनं जून २०१४ पासून उड्डाणास सुरूवात केली होती आणि कंपनी प्रवासी वाहतूक, एअर कार्गो आणि चार्टर उड्डाण सेवा पुरवते. कंपनी कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पुरवत नाही.

Web Title: Tata Group approaches CCI for merger between Air India and AirAsia India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.