lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रुपयातील बदलांमुळे बाजारात सतत अस्थिरता- एसबीआय

रुपयातील बदलांमुळे बाजारात सतत अस्थिरता- एसबीआय

एसबीआयच्या संशोधनानुसार चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धीदर ७.७ टक्के राहण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 04:56 AM2018-08-25T04:56:38+5:302018-08-25T04:57:34+5:30

एसबीआयच्या संशोधनानुसार चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धीदर ७.७ टक्के राहण्याची शक्यता आहे.

Sustainable volatility in rupee changes - SBI | रुपयातील बदलांमुळे बाजारात सतत अस्थिरता- एसबीआय

रुपयातील बदलांमुळे बाजारात सतत अस्थिरता- एसबीआय

कोलकाता : रुपयात अचानक होणारे चढ-उतार चांगले नाहीत; त्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण होते, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाचे समूह आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष यांनी केले.
आयसीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात सहभागी होण्यासाठी सौम्यकांती घोष येथे आले होते. त्या वेळी त्यांना प्रसारमाध्यमांना सांगितले की, अलीकडे रुपयामध्ये क्रमबद्ध पद्धतीने घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांत रुपया ६४ वरून ७0 वर गेला आहे. म्हणजेच एक डॉलरची किंमत ६४ रुपयांवरून ७0 रुपये झाली आहे. रुपया ७२ वर गेला किंवा कसे हा मुद्दाच नाही. अचानक होणारी वाढ किंवा घट योग्य नाही. त्यामुळे बाजारात सतत अस्थिरता निर्माण होत राहते.
जीडीपीच्या वृद्धीबाबत घोष म्हणाले, एसबीआयच्या संशोधनानुसार चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धीदर ७.७ टक्के राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण वित्तवर्षात तो ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. नोटाबंदी व जीएसटी यांचा अर्थव्यवस्थेवरील दुहेरी परिणाम आता ओसरला आहे. 

नियंत्रणाचे अधिकार
सरकारी बँकांवर रिझर्व्ह बँक व सरकार असे दोघांचे नियंत्रण आहे. सरकारी बँकांच्या नियंत्रणासाठी आपल्याकडे पुरेसे अधिकारच नाहीत, असे वक्तव्य रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी अलीकडे केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर घोष यांनी सांगितले, सरकारी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पुरेसे अधिकार आहेत. खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांना अधिक आॅडिट करावे लागतात. कोणत्याही बँकेचे शासन हे मालकी निरपेक्ष असते.

Web Title: Sustainable volatility in rupee changes - SBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.