Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जि़प़ला मिळणारे अनुदान वेळेत खर्च करण्याचे नियोजन सुरेश काकाणी : जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या रकमेचा 38 टक्के खर्च

जि़प़ला मिळणारे अनुदान वेळेत खर्च करण्याचे नियोजन सुरेश काकाणी : जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या रकमेचा 38 टक्के खर्च

सोलापूर :

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:31+5:302014-12-02T23:30:31+5:30

सोलापूर :

Suresh Kakani: 38% of the amount received from the District Planning Committee | जि़प़ला मिळणारे अनुदान वेळेत खर्च करण्याचे नियोजन सुरेश काकाणी : जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या रकमेचा 38 टक्के खर्च

जि़प़ला मिळणारे अनुदान वेळेत खर्च करण्याचे नियोजन सुरेश काकाणी : जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या रकमेचा 38 टक्के खर्च

लापूर :
जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीपैकी 90 टक्के खर्च मार्चअखेर कसा होईल याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली़
जिल्हा नियोजन समिती तसेच अभिकरण आणि हस्तांतरण योजनेतून जिल्हा परिषदेला 143 कोटी मंजूर आहेत़ प्राप्त अनुदान 32 कोटी आणि पूर्वीचे शिल्लक अनुदान 64 कोटी असे 97 कोटी सध्या शिल्लक आहेत़ जेवढे अनुदान प्राप्त होईल त्यापैकी किमान 90 टक्के तरी निधी खर्च झालाच पाहिजे असे नियोजन केले जात आह़े एमआयए या नव्या प्रणालीमुळे ग्रामपंचायत स्तरावरुन वेळेत आणि योग्य अहवाल येऊ लागल्यामुळे खर्चदेखील वाढला आह़े त्यामुळे खोटेनाटे अहवाल दिले जात नाहीत़ गतवर्षी 20 टक्के खर्च होता यंदा हाच खर्च 38 टक्क्यांवर आह़े
चौकट़़़
आर्शमशाळेबाबत पत्र
20 नोव्हेंबर रोजी एक दिवस शाळेसाठी या मोहिमेत विविध अधिकार्‍यांनी शाळांची तपासणी केली़ चार आर्शमशाळांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत़ यातील दोन प्राथमिक आणि दोन माध्यमिक असून याबाबत समाजकल्याण विभागाला पत्र देण्यात आले आह़े

Web Title: Suresh Kakani: 38% of the amount received from the District Planning Committee