lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल, 250 रुपयांत उघडा खाते अन् मिळवा 50 लाखांचा फायदा

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल, 250 रुपयांत उघडा खाते अन् मिळवा 50 लाखांचा फायदा

मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता केंद्रानं डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 09:12 AM2018-12-19T09:12:29+5:302018-12-19T09:16:20+5:30

मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता केंद्रानं डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली.

sukanya samriddhi yojana ssy maturity amount how to open sukanya samriddhi account | सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल, 250 रुपयांत उघडा खाते अन् मिळवा 50 लाखांचा फायदा

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत बदल, 250 रुपयांत उघडा खाते अन् मिळवा 50 लाखांचा फायदा

Highlightsकेंद्र सरकारनं डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.5 टक्के केले आहे.सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत आपण फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडू शकतो. ज्यासाठी पहिल्यांदा 1000 रुपये मोजावे लागत होते.

नवी दिल्लीः मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला. केंद्र सरकारनं या योजनेमध्ये आणखी सुधारणा करून नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.5 टक्के केले आहे.

1 ऑक्टोबरपासून नवे व्याजदर लागू झाले असून, आपल्याला या व्याजदरामुळे मोठा फायदा मिळू शकतो. काही दिवसांपूर्वीच सराकरनं या योजनेत बदल केले आहेत. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत आपण फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडू शकतो. ज्यासाठी पहिल्यांदा 1000 रुपये मोजावे लागत होते. आपल्यालाही जर मुलगी असेल तर केंद्राची ही योजना भरपूर फायदेशीर ठरू शकते. विशेष म्हणजे सदर खाते भारतात कुठेही एका डाकघरातून दुसऱ्या डाकघरात स्थानांतरित करण्यात येते. या योजनेत पालकाला समाविष्ट होण्यासाठी कुठलीही अट ठेवण्यात आली नाही. 

  • अशी आहेत उद्दिष्ट्ये - जन्मापासून ते 10 वर्षं वयोगटातील मुलींची खाती या योजनेंतर्गत उघडता येते. दाम्पत्याला दोन मुलींपर्यंत या योजनेत भाग घेता येऊ शकते. कमीत कमी 250 रुपये व अधिकाधिक दीड लक्ष रुपये एका वित्तीय वर्षात मुलीच्या खात्यामध्ये जमा करता येऊ शकते. यावर शासनाकडून 9.2 टक्के दराने व्याज दिले जाते. खातेधारकाची किंवा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षण किंवा विवाहप्रसंगी खर्चाची पूर्तता पूर्ण करण्यासाठी पूर्ण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येते. 21 वर्षे वय पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व झाले असे नमूद आहे. 
  • कुठे उघडू शकतो खातं- मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत, कुठल्याही टपाल कार्यालयात किंवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत, तिचे जन्म प्रमाणपत्र सादर करून केवळ एक हजार रुपयांच्या ठेवीवर पालक हे खाते उघडू शकतात. 
  • किती कराल गुंतवणूक-  मुलीच्या पालकांना या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत तिच्या पालकांना या खात्यातील व्यवहार करता येतील, तर मुलगी 10 वर्षांची झाल्यानंतर तिला खात्याचे व्यवहार करण्यास पात्र समजले जाईल. या खात्याला 21 वर्षांची मुदत आहे. 
  • प्राप्तिकरातून मिळते सूट- या योजनेत दीड लक्ष रुपयांपर्यंतच्या अंतर्गत प्राप्तिकर सूट देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत समाविष्ट लाभार्थ्यांला मदत एकाच टप्प्यात मिळणार असल्याने विकासाचे पर्यायाने समृद्धीचे बळ मिळेल.

Web Title: sukanya samriddhi yojana ssy maturity amount how to open sukanya samriddhi account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.