lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विक्रीच्या जोरदार माऱ्याने शेअर बाजारात तीव्र घसरण

विक्रीच्या जोरदार माऱ्याने शेअर बाजारात तीव्र घसरण

सेन्सेक्स ८१२ अंशांनी खाली : निफ्टीने गमावली ११,३००ची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 06:08 AM2020-09-22T06:08:35+5:302020-09-22T06:08:44+5:30

सेन्सेक्स ८१२ अंशांनी खाली : निफ्टीने गमावली ११,३००ची पातळी

The stock market plummeted on the back of strong sales | विक्रीच्या जोरदार माऱ्याने शेअर बाजारात तीव्र घसरण

विक्रीच्या जोरदार माऱ्याने शेअर बाजारात तीव्र घसरण

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : युरोपमध्ये वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झालेल्या खनिज तेलाच्या किमती, जगभरातील शेअर बाजारांमध्ये होत असलेली विक्री यामुळे भारतातील शेअर बाजारातही जोरदार विक्री होऊन निर्देशांकांची मोठी घसरण झालेली बघावयास मिळाली. सेन्सेक्स ८१२ अंशांनी तर निफ्टी २५५ अंशांनी खाली येऊन बंद झाले.


मुंबई शेअर बाजारात सोमवारी सप्ताहाची सुरुवात अडखळत झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक अवघा ५ अंश वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये होत असलेल्या विक्रीचा परिणाम बाजारावर दिसू लागला.
दिवसाच्या उत्तरार्धामध्ये बाजारातील विक्रीचा जोर वाढू लागला. रिलायन्स इंडस्ट्रिज, आयसीआयसीआय बँक तसेच भारतीय एअरटेल यांना विक्रीचा जोरदार फटका बसला.


दिवसअखेर संवेदनशील निर्देशांक ८११.६८ अंश म्हणजेच २.०९ टक्क्यांनी घसरून ३८,०३४.१४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २.२१ टक्क्यांनी घसरला. या निर्देशांकात दिवसअखेर २५४.४० अंशांची घट झाली. दिवसअखेर निफ्टी ११,२५०.५५ अंशांवर बंद झाला. विक्रीच्या माºयामुळे निफ्टीला ११,३०० अंशांची पातळी राखता आली नाही.
कोटक बँक, इन्फोसिस आणि टीसीएस अशा काही मोजक्या आस्थापनांच्या दरामध्ये वाढ झाली.

बाजार घसरण्याची ही आहेत कारणे
च्युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटन आणि स्पेन या देशांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपातील अन्य देशांनाही कोरोनाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
च्लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता लक्षात घेऊन युरोपातील सर्वच शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करून नफा कमाविला गेला. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरणीच्या स्वरूपात दिसून आला.
च्आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेलाच्या दरामध्ये घट झालेली दिसून येऊ लागली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली असून, याचा परिणाम म्हणून भारतातील गुंतवणूकदारांनीही दिवसाच्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणावर विक्री केली.

Web Title: The stock market plummeted on the back of strong sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.