Lokmat Money > बिझनेस न्यूज > लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल

लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल

रिझर्व्ह बँकेने बुधवारी  केंद्र सरकारला २.१ लाख कोटींचा लाभांश देण्यास मंजुरी दिली. निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी हा लाभांश मोठा आर्थिक आधार ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:15 AM2024-05-24T06:15:56+5:302024-05-24T06:17:04+5:30

रिझर्व्ह बँकेने बुधवारी  केंद्र सरकारला २.१ लाख कोटींचा लाभांश देण्यास मंजुरी दिली. निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी हा लाभांश मोठा आर्थिक आधार ठरेल.

Stock market jumps high before Lok Sabha results; A decision of the Reserve Bank and investor wealth | लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल

लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल

मुंबई : केंद्र सरकारला विक्रमी २.११ लाख कोटींचा लाभांश देण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली मंजुरी, बँकिंग, पेट्रोलियम आणि ऑटोमोबाइल कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १.९० टक्क्यांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १.६ टक्क्यांनी वाढत गुरुवारी सार्वकालिक उच्चांक गाठला. त्यामुळे दिवसभरात गुंतवणूकदारांना तब्बल ४.२८ लाख कोटींचा नफा झाला.

- सेन्सेक्स -  १,१९६  - ७५,४१८.०४  
- निफ्टी - ३६९ - २२,९६७.६५   

बाजार वधारण्याची काय कारणे? 
- रिझर्व्ह बँकेने बुधवारी  केंद्र सरकारला २.१ लाख कोटींचा लाभांश देण्यास मंजुरी दिली. निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी हा लाभांश मोठा आर्थिक आधार ठरेल.
- मिडकॅप व स्मॉल कॅप शेअर्सकडून विक्रमी कामगिरी केली जात आहे. गुरुवारीही बीएसई मिडकॅप शेअर्स ०.६ टक्के, तर स्मॉलकॅप शेअर्समध्ये ०.३ टक्के वाढ झाली.
- मागच्या काही सत्रांत परकीय गुंतवणूकदारांनी विशेषतः रोखे बाजारात विक्रीचा सपाटा लावला होता. मात्र, आता ते खरेदीवर भर देत असल्याने बाजारात तेजी वाढण्यास मदत झाली.

Web Title: Stock market jumps high before Lok Sabha results; A decision of the Reserve Bank and investor wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.