lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी; मात्र पेटीएमचा शेअर २० टक्क्यांनी घसरला!

बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी; मात्र पेटीएमचा शेअर २० टक्क्यांनी घसरला!

आरबीआयकडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचे लोअर सक्रिट लागले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 10:35 AM2024-02-01T10:35:54+5:302024-02-01T10:39:00+5:30

आरबीआयकडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचे लोअर सक्रिट लागले आहे. 

Stock market bulls ahead of budget 2024 But the share of Paytm fell by 20 percent | बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी; मात्र पेटीएमचा शेअर २० टक्क्यांनी घसरला!

बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी; मात्र पेटीएमचा शेअर २० टक्क्यांनी घसरला!

Share Market ( Marathi News ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतिम बजेट सादर करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सादर होत असलेलं हे अंतरिम बजेट असणार आहे. या बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. अपेक्षेप्रमाणे आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

शेअर बाजार उघडल्यानंतर आज BSE सेन्सेक्स ४० अंकानी वाढून ७१, ९९८.७८ च्या स्तरावर उघडला. तसंच NSE निफ्टीने २१७८० च्या स्तरावर सुरुवात केली. बाजार उघडताच पेटीएमच्या शेअरमध्ये मात्र मोठी घसरण झाली. आरबीआयकडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचे लोअर सक्रिट लागले आहे. 

पेटीएम शेअर्सवर आरबीआय कारवाईचा परिणाम

विविध अहवालांमध्ये बँकिंग नियमावलींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला काल मोठा धक्का दिला. २९ फेब्रुवारीनंतर खात्यात पैसे भरण्यासह नव्या ग्राहकांची नोंदणी, प्रीपेड सेवा, वॉलेट व फास्टॅग रिचार्ज आदी बँकिंग सेवा पेटीएम बँकेद्वारे करता येणार नाही. तसंच पेटीएम बँकेचे ग्राहक सध्या त्यांच्या खात्यातील रक्कम काढू शकतात. रक्कम काढून घेण्यावर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. रिझर्व्ह बँकेने बुधवारी याबाबतचे आदेश जारी करताना पेटीएम  बँकेने सातत्याने नियमांचे उल्लंघन आणि लेखापरीक्षणासंबंधी चिंता  व्यक्त केली. आरबीआयच्या या निर्णयाचा परिणाम आज पेटीएमच्या शेअरवर झाल्याचं पाहायला मिळालं.
 

Web Title: Stock market bulls ahead of budget 2024 But the share of Paytm fell by 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.