lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea : 10 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, दरमहा होईल मोठी कमाई!

Business Idea : 10 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, दरमहा होईल मोठी कमाई!

Business Idea : आजच्या काळात डेअरी फार्मिंग एक उत्तम क्षेत्र आहे, जिथे भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 11:30 AM2021-07-07T11:30:40+5:302021-07-07T11:35:40+5:30

Business Idea : आजच्या काळात डेअरी फार्मिंग एक उत्तम क्षेत्र आहे, जिथे भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

start diary farm business in 10 thousand rupees and earn 1 lakh per month know how details here | Business Idea : 10 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, दरमहा होईल मोठी कमाई!

Business Idea : 10 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, दरमहा होईल मोठी कमाई!

नवी दिल्ली : जर तुम्ही नवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला एक शानदार व्यवसायाबद्दल (Business Idea's) माहिती देत आहोत.  या व्यवसायात तुम्ही सुरुवातीला केवळ 10 हजार रुपये गुंतवून मोठी कमाई (Earn money) करू शकता. यासाठी तुम्ही डेअरी फार्मिंगचा (Dairy Farm) व्यवसाय करू शकता. आजच्या काळात डेअरी फार्मिंग एक उत्तम क्षेत्र आहे, जिथे भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. जरी तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तरीही काळजी करू नका. तुम्हाला केंद्र सरकार मदत करू शकते. 

कसा सुरू कराल डेअरी फार्मिंगचा व्यवसाय?
डेअरी फार्मिंगचा लहान स्वरूपात व्यवसाय सुरू करताना तुम्ही कमी गायी आणि म्हशी विकत घेऊ शकता, त्यानंतर टप्प्याटप्प्याने जनावरांची संख्या वाढवू शकता. त्यासाठी सर्वोत्तम जातीच्या गायी (Cows) आणि म्हशी (Buffaloes) खरेदी करा आणि त्यांची योग्य व्यवस्था करा. त्यांना चांगल्या दर्जाचा चारा द्या म्हणजे दूधाचे उत्पादन वाढेल आणि यामुळे तुमची कमाई सुद्धा वाढेल. तुम्ही तुमच्या नावे डेअरी फार्म सुरू करू शकता.


दोन जनावरांपासून सुरू करू शकता डेअरी फार्म
तुम्ही जर छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर दोन गायी किंवा म्हशी विकत घेऊन डेअरी व्यवसायाला सुरुवात करू शकता. मात्र जी जनावरे खरेदी कराल ती उच्च जातीची आणि भरपूर दूध देणारी असावीत. यामुळे तुम्हाला तोटा होईल. त्यामुळे शक्यतो पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने जनावरे खरेदी करा. दोन जनावरे खरेदी करण्यासाठी 35 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते.


सरकार 2.5 लाखांचे अनुदान देऊ शकते
डेअरी फार्मिंग उद्योगाला (Dairy industry) चालना देण्यासाठी सरकारने डेअरी उद्योजकता विकास योजना सुरू केली आहे. आधुनिक डेअरी तयार करणे हा या योजननेचा मुख्य उद्देश आहे. तसेच, शेतकरी आणि गुराख्यांनी डेअरी फार्म सुरू करावे आणि आपले उत्पन्न वाढवावे अशी अपेक्षा सरकारला आहे. त्यामुळेच सरकार या व्यवसायात येणाऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देत आहे. या योजनेअंतर्गत बँकेच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे या कर्जावर अनुदान मिळते. जर तुम्हाला 10 जनावरांचे डेअरी फार्म सुरू करायचे तर तुम्हाला 10 लाख रुपयांची आवश्यकता लागेल. केंद्रीय कृषी मंत्रालयाने DEDS योजनेअंतर्गत आपल्याला जवळपास 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळू शकेल. हे अनुदान नाबार्डच्यावतीने देण्यात येते.

Web Title: start diary farm business in 10 thousand rupees and earn 1 lakh per month know how details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.