Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन लाख रुपये गुंतवून घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल १ लाखांपर्यंत कमाई, जाणून घ्या कशी?

दोन लाख रुपये गुंतवून घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल १ लाखांपर्यंत कमाई, जाणून घ्या कशी?

Business News: या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला कुठलीही मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. तर तुम्ही अगदी मोजक्या पैशांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 04:00 PM2021-09-29T16:00:55+5:302021-09-29T16:01:19+5:30

Business News: या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला कुठलीही मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. तर तुम्ही अगदी मोजक्या पैशांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

Start this business by investing Rs 2 lakh at home, you will earn up to Rs 1 lakh per month, know how? | दोन लाख रुपये गुंतवून घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल १ लाखांपर्यंत कमाई, जाणून घ्या कशी?

दोन लाख रुपये गुंतवून घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल १ लाखांपर्यंत कमाई, जाणून घ्या कशी?

नवी दिल्ली - जर तुम्ही नोकरीला कंटाळला असाल आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया सुचवणार आहोत. या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरी एका स्वदेशी प्रॉडक्टचे उत्पादन करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला कुठलीही मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. तर तुम्ही अगदी मोजक्या पैशांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. (Start this business by investing Rs 2 lakh at home, you will earn up to Rs 1 lakh per month, know how?)

जर तुमच्याकडे जमीन असेल आणि कमी गुंतवणुकीत स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही फ्लाय अॅश ब्रिक्स म्हणजेच राखेच्या विटा तयार करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. फ्लाय अॅश ब्रिकला सर्वसाधारणपणे सिमेंटच्या विटा असेही म्हणतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी १०० फूट जमीन आणि किमान दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. या माध्यमातून तुम्ही दरमहा एक लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

वेगाने नागरिकरण होत असल्याने बिल्डर फ्लाय अॅश विटांचा वापर करत आहेत. या फ्लाय अॅश विटा विजकेंद्रामधून निघणारी राख, सिमेंट आणि स्टोन डस्टच्या मिश्रणामधून तयार केले जाते. या व्यवसायासाठी गुंतवणुकीचा बहुतांश भाग हा तुम्हाला मशिनरीमध्ये गुंतवावा लागतो. ही मेन्युअल मशीन तु्म्ही सुमारे १०० यार्ड जमिनीवर लावू शकता. या मशिनीच्या माध्यमातून विटांच्या उत्पादनासाठी तुम्हाला ५ ते सहा लोकांची आवश्यकता असेल. यामधून दररोज सुमारे तीन हजार विटांचे उत्पादन होऊ शकते. या गुंतवणुकीमध्ये कच्च्या मालासाठी येणारा खर्च समाविष्ट केलेला नाही.

या व्यवसायात ऑटोमॅटिक मशीनचा वापर, खर्चाची संधी वाढवतो. मात्र या मशिनीची किंमत १० ते १२ लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये कच्च्या मालाच्या मिश्रणापासून विट बनवण्यापर्यंत सर्वाचा यामध्ये समावेश आहे. ऑटोमेटिक मशिनीमधून एक तासामध्ये एक हजार विटा तयार करता येऊ शकतील. म्हणजेच या मशिनीमधून तुम्ही महिन्यामध्ये ३ ते चार लाख विटांचे उत्पादन करू शकता.

हा व्यवसाय तुम्ही बँकेकडून लोन घेऊनही सुरू करू शकता. पंतप्रधान रोजगार योजना आणि मुख्यमंत्री युवा स्व-रोजगार योजनेंतर्गत या व्यवसायासाठी लोन घेता येऊ शकते. याशिवाय मुद्रा लोनचा पर्यायही उपलब्ध आहे.  

Web Title: Start this business by investing Rs 2 lakh at home, you will earn up to Rs 1 lakh per month, know how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.