lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टाच्या आरडी योजनेत गुंतवणूकीचे आहेत फायदे; पाहा या सरकारी योजनेचे डिटेल्स

पोस्टाच्या आरडी योजनेत गुंतवणूकीचे आहेत फायदे; पाहा या सरकारी योजनेचे डिटेल्स

पाहा काय आहे स्कीम आणि किती करावी लागेल गुंतवणूक.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 04:13 PM2021-12-26T16:13:14+5:302021-12-26T16:13:32+5:30

पाहा काय आहे स्कीम आणि किती करावी लागेल गुंतवणूक.

savings investment in post office rd scheme is a profitable deal know the complete details of this government scheme | पोस्टाच्या आरडी योजनेत गुंतवणूकीचे आहेत फायदे; पाहा या सरकारी योजनेचे डिटेल्स

पोस्टाच्या आरडी योजनेत गुंतवणूकीचे आहेत फायदे; पाहा या सरकारी योजनेचे डिटेल्स

तुमचे भविष्यातील खर्च आणि आर्थिक गरजा योग्यरित्या चालवण्यासाठी बचत करणे आवश्यक आहे. बचत भविष्यातील आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यात खूप मदत करते. तुमचे बचतीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही त्यावर कमाई देखील करू शकता. रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच बचतीचे पैसे गुंतवण्याचा सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून नेहमीच ओळखला जातो. जर तुम्हाला आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम तुम्हाला फक्त १०० रुपये प्रति महिना गुंतवणुक सुरू करण्याची संधी देते.

पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडीवर ५.८ टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ उपलब्ध आहे. आरडीकडून मिळणाऱ्या व्याजावरही कर भरावा लागतो. या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस आरडीमधील व्याजदर तीन महिन्यांसाठी चक्रवाढी प्रमाणे असतो.

कोण सुरू करू शकतं खातं
१८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये आपले खाते उघडू शकते. या पोस्ट ऑफिस योजनेत संयुक्त खाते देखील उघडता येते. अल्पवयीन व्यक्तीचे खाते पालकाच्या वतीने देखील उघडले जाऊ शकते. या प्लॅनमध्ये तुम्ही तुम्हाला हवी तेवढी खाती उघडू शकता.

जमा करण्याची रक्कम
पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला खात्यात महिन्याला किमान १०० रुपये जमा करावे लागतील. जर तुमचे खाते महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत उघडले असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत रक्कम जमा करावी लागेल. त्याच वेळी, जर तुम्ही तुमचे खाते महिन्याच्या शेवटच्या १५ दिवसांत उघडले असेल, तर तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी त्यात रक्कम जमा करावी लागेल.

कर्जही मिळणार
तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये कर्ज घेण्याच्या सुविधेचा लाभ देखील मिळतो. जर तुम्ही या योजनेत तुमचे १२ हप्ते जमा केले असतील, तर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या ५० टक्के कर्ज घेतले जाऊ शकते.

Web Title: savings investment in post office rd scheme is a profitable deal know the complete details of this government scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.