lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक 

रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक 

सौदी अराम्को 20 टक्के शेअर्स खरेदी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:08 PM2019-08-12T13:08:28+5:302019-08-12T13:10:44+5:30

सौदी अराम्को 20 टक्के शेअर्स खरेदी करणार

ril announces biggest fdi deal with saudi aramco to pick 20 percent stake in its otc | रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक 

रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक 

नवी दिल्ली: रिलायन्स उद्योग समूहात आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली. रिलासन्स उद्योग 2018-19 आर्थिक वर्षात सर्वाधिक नफा कमावणारी समूह असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. सौदी अराम्को रिलायन्समधील 20 टक्के शेअर्स खरेदी करणार असल्याची माहिती अंबानी यांनी दिली. आज रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. 

रिलायन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक झाल्याचं मुकेश अंबानी म्हणाले. सौदी अराम्को रिलायन्सच्या ऑईल आणि केमिकल (ओ टू सी) व्यवसायात गुंतवणूक करणार आहे. अराम्कोकडून रिलायन्समध्ये 5.25 लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल. 'रिलायन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे. सौदी अराम्को आणि रिलायन्समध्ये बऱ्याच कालावधीपासून यासाठी चर्चा सुरू होती,' असं अंबानी म्हणाले. 

रिलायन्सच्या ऑईल टू केमिकल व्यवसायचं महसुली उत्पन्न 5 लाख कोटी रुपये आहे. सौदी अराम्को रिलायन्सच्या ऑईल टू केमिकल व्यवसायात गुंतवणूक करेल. सौदी अराम्को जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. रिलायन्समधील 20 टक्के शेअर्स खरेदी केल्यावर अराम्को दर दिवसाला 5 लाख बॅरल तेलाचा पुरवठा कंपनीला करेल. गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. हा जगातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असून त्याची क्षमता 14 लाख बॅरल इतकी आहे. 
 

Web Title: ril announces biggest fdi deal with saudi aramco to pick 20 percent stake in its otc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.