lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार 

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार 

रिलायन्स जिओकडून महत्त्वाची घोषणा; कोट्यवधी ग्राहकांना फायदा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 03:12 PM2020-12-31T15:12:56+5:302020-12-31T15:13:27+5:30

रिलायन्स जिओकडून महत्त्वाची घोषणा; कोट्यवधी ग्राहकांना फायदा मिळणार

Reliance Jio to make domestic voice calls free from January 1 | रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार 

रिलायन्स जिओकडून ग्राहकांना 'न्यू इयर गिफ्ट'; उद्यापासून लाभ मिळणार 

मुंबई: रिलायन्स जिओनं ग्राहकांना नववर्षाचं गिफ्ट दिलं आहे. उद्यापासून म्हणजेच १ जानेवारीपासून जिओच्या ग्राहकांना मोफत लोकल व्हॉइज कॉल्स करता येतील. काही महिन्यांपूर्वीच रिलायन्स जिओनं इतर नेटवर्कवर कॉल केल्यास पैसे आकारण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी अनेक प्लानदेखील लॉन्च केले होते.

टेलिकॉम अथॉरॉटी ऑफ इंडियाच्या आदेशानुसार १ जानेवारीपासून डोमॅस्टिक व्हॉइज कॉल्ससाठी इंटरकनेक्ट युजेस चार्जेसची (आयसीयू) आकारणी थांबवणार असल्याचं रिलायन्स जिओनं सांगितलं आहे. त्यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी इतर कंपन्यांची सेवा वापरत असलेल्या ग्राहकांना कॉल केल्यास त्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत.

रिलायन्स जिओच्या ग्राहकांनी दुसऱ्या नेटवर्कवर फोन केल्यास त्यासाठी पैसे आकारण्याचा निर्णय कंपनीनं सप्टेंबर २०१९ मध्ये घेतला होता. यासाठी कंपनीनं ट्रायच्या आयसीयू शुल्काचा संदर्भ दिला होता. आता ट्रायनं आयसीयू शुल्क आकारणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिलायन्स जिओनं लोकल ऑफनेट कॉल्स मोफत असतील, अशी घोषणा केली. याचा लाभ ग्राहकांना उद्यापासून घेता येईल.

Web Title: Reliance Jio to make domestic voice calls free from January 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.