lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

शिवम बँकेतील २४ कोटी ४० लाखांचा घोळ केल्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ३७ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 10:20 AM2021-01-31T10:20:18+5:302021-01-31T10:28:38+5:30

शिवम बँकेतील २४ कोटी ४० लाखांचा घोळ केल्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ३७ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे.

RBI cancels license of Kolhapurs Shivam Sahakari Bank due to inadequate capital | महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आता आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवम बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. आरबीआयने याआधीच शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. 

आरबीआय परवानगी शिवाय सहकारी बँकांना लाभांश नाही : सुभाष मोहिते

शिवम बँकेतील २४ कोटी ४० लाखांचा घोळ केल्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ३७ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. आता बँकेचा थेट परवाना रद्द झाल्याने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. याआधी आरबीआयने कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने हा मोठा निर्णय जाहीर केला होता. याच पार्श्वभूमीवर आता शिवम सहकारी बँकेचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. 

आरबीआय महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता

"शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. त्यामुळेच बँकेचा परवाना तात्काळ रद्द करण्यात येत आहे. २९ जानेवारी २०२१ पासून बँकेला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत", असं आरबीआयनं म्हटलं आहे. 

खातेधारकांना दिला दिलासा
शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द झालेला असला तरी खातेधारकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. पैसे जमा करणाऱ्या ९९ टक्क्यांहून अधिक खातेधारकांची रक्कम इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे आहे. बँकेत पैसे जमा असलेल्या खातेधारकांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. 
 

Read in English

Web Title: RBI cancels license of Kolhapurs Shivam Sahakari Bank due to inadequate capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.