lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे आहे का? जाणून घ्या 'ही' सोपी प्रोसेस

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे आहे का? जाणून घ्या 'ही' सोपी प्रोसेस

Ration Card News : कोरोना महामारी सुरू झाल्यापासून केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana)सुमारे 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 03:43 PM2022-06-28T15:43:20+5:302022-06-28T15:46:15+5:30

Ration Card News : कोरोना महामारी सुरू झाल्यापासून केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana)सुमारे 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे.

ration card follow these step by step process to add new member name in ration card | रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे आहे का? जाणून घ्या 'ही' सोपी प्रोसेस

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे आहे का? जाणून घ्या 'ही' सोपी प्रोसेस

रेशन कार्ड (Ration Card) हे पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) सारखेच महत्त्वाचे दस्तऐवज (Important Documents) आहे. कोणत्याही कुटुंबाचे सर्व डिटेल्स रेशन कार्डमध्ये जोडले जातात. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana)सुमारे 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे. सन 2020 ते सप्टेंबर 2022 पर्यंत सरकारने ही योजना लागू केली आहे. या माध्यमातून करोडो लोकांना मोफत रेशनची सुविधा मिळत आहे.

यासोबतच रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव, वय, पत्ता इत्यादी नोंदवलेले असते. अनेक वेळा घरात मूल जन्माला आल्यानंतर किंवा कुटुंबात नवीन सून आल्यानंतर लोकांच्या नवीन सदस्याचे नाव जोडावे लागते. यामुळे तुम्हाला त्या सदस्याचे रेशनही सहज मिळेल. तर मग रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडायचे त्याबद्दल जाणून घेऊया...

नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता....
- रेशन कार्ड धारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो  (Passport Size Photo)
- सुनेचे आधार कार्ड (Aadhaar Card)
- पतीचे आधार कार्ड
- विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate)
- मुलाचे जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
- पालकांचे आधार कार्ड

ऑनलाईन रेशन कार्डमध्ये याप्रमाणे नावे टाका...
1. यासाठी तुम्ही प्रथम राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या वेबसाइटला भेट द्या.
2. यानंतर, होमपेजवर जा आणि एका व्यक्तीचे नाव जोडा.
3. यानंतर, पुढील मागितलेली सर्व कागदपत्रे सबमिट करा.
4. यानंतर सर्व माहितीची पडताळणी करा.
5. यानंतर, काही दिवसात, त्या नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत जोडले जाईल.

ऑफलाइन रेशन कार्डमध्ये नाव असे अॅड करा....
1. यासाठी तुम्ही सर्वात आधी अन्न पुरवठा केंद्रात जावे लागेल.
2. यानंतर, तुम्हाला नाव जोडण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल, जो तुम्ही भरा.
3. यानंतर तुम्ही फॉर्म भरा आणि विनंती केलेल्या कागदपत्राची एक कॉपी अटॅच करा.
4. त्यानंतर काही फी जमा करा आणि पावती मिळवा.
5. यानंतर, काही दिवसात, त्या नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत जोडले जाईल.

Web Title: ration card follow these step by step process to add new member name in ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.