lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आर्थिक सेवा क्षेत्रात नऊ लाख नोकऱ्यांचीे शक्यता

आर्थिक सेवा क्षेत्रात नऊ लाख नोकऱ्यांचीे शक्यता

सर्वाधिक वेतनवाढीत पुणे तिसरे स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 06:41 AM2018-09-01T06:41:05+5:302018-09-01T10:45:03+5:30

सर्वाधिक वेतनवाढीत पुणे तिसरे स्थानी

The probability of nine lakh jobs in the financial services sector | आर्थिक सेवा क्षेत्रात नऊ लाख नोकऱ्यांचीे शक्यता

आर्थिक सेवा क्षेत्रात नऊ लाख नोकऱ्यांचीे शक्यता

मुंबई : देशातील ई-कॉमर्स उद्योगाचा विस्तार व डिजिटायझेशनमुळे आर्थिक सेवा, बँकिंग व विमा क्षेत्रात (बीएफएसआय) पुढील चार वर्षांत ९ लाख नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या प्रामुख्याने मुंबई व पुणेसह ९ शहरांमध्ये असतील. ‘टीमलीझ सर्व्हिसेस’ने हा अंदाज वर्तवला आहे.

सध्या ई-कॉमर्स आणि अ‍ॅप आधारित उद्योगांचा झपाट्याने प्रसार होत आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. आगामी काळात आयटीची राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूमध्ये काम करणाºया कर्मचाºयांना सर्वाधिक १२.६३ टक्के इतकी वेतनवाढ मिळू शकणार आहे. त्यापाठोपाठ दिल्लीत १२.२६ टक्के व पुण्यातील कर्मचाºयांना ११.१४ टक्के वेतनवाढ मिळेल असा अंदाज आहे.

बंगळुरूमध्ये कर्मचाऱ्याचे सरासरी मासिक वेतन देशात सर्वाधिक १.२९ लाख रुपये इतके असेल. त्यापाठोपाठ दिल्लीतील १.२६ लाख व अहमदाबादमध्ये १.२५ लाख रुपये असेल, असा अंदाज आहे. यामध्ये पुणे चौथ्या व मुंबई पाचव्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत कमी वेतनवाढ
मुंबई आर्थिक राजधानी असली तरी सध्या अनेक कंपन्या त्यांची मुख्यालये दिल्लीकडे वळवत आहेत. त्यामुळेच मुंबईत काम करणाºया कर्मचाºयांना अन्य महत्त्वाच्या शहरांच्या तुलनेत कमी वेतनवाढ मिळण्याचा अंदाज आहे.

Web Title: The probability of nine lakh jobs in the financial services sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.