lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जनधन खाते आधारशी लिंक करा, नाहीतर 1.30 लाख रुपयांचे होईल नुकसान

जनधन खाते आधारशी लिंक करा, नाहीतर 1.30 लाख रुपयांचे होईल नुकसान

jan dhan account : सरकारकडून या खात्यांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 09:41 AM2020-11-11T09:41:15+5:302020-11-11T09:42:21+5:30

jan dhan account : सरकारकडून या खात्यांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

pradhan mantri jan dhan account sbi jan dhan account is not linked from aadhar then you will not get benefits of 1 lakh 30 thousand rupees | जनधन खाते आधारशी लिंक करा, नाहीतर 1.30 लाख रुपयांचे होईल नुकसान

जनधन खाते आधारशी लिंक करा, नाहीतर 1.30 लाख रुपयांचे होईल नुकसान

Highlightsया खात्यातील ग्राहकांना रूपे डेबिट कार्ड देण्यात येते. ज्यामध्ये अपघाताचा 1 लाख रुपयांचा विमा दिला जातो. मात्र, तुमचे हे खाते आधार कार्डसोबत लिंक केले नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही.

नवी दिल्ली: जर तुम्ही जनधन बँक खातेही उघडले असेल तर तुमचे खाते आधार कार्डशी लिंक करा. अन्यथा तुम्हाला 1.30 लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. सरकारकडून या खात्यांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. हे बँक खाते झिरो बॅलन्स (शून्य शिल्लक) बचत खाते आहे. या व्यतिरिक्त यामध्ये ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह अनेक सुविधा दिली जाते. 

असे होईल 1.3 लाख रुपयांचे नुकसान?
या खात्यातील ग्राहकांना रूपे डेबिट कार्ड देण्यात येते. ज्यामध्ये अपघाताचा 1 लाख रुपयांचा विमा दिला जातो. मात्र, तुमचे हे खाते आधार कार्डसोबत लिंक केले नाही तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. म्हणजेच, तुम्हाला थेट एक लाख रुपयांचे नुकसान होईल. याशिवाय, या खात्यावर 30000 रुपयांचा अपघाती मृत्यू विमा संरक्षण दिले जाते. हे विमा संरक्षण आधार कार्ज बँक खात्याशी लिंक झाल्यानंतरच उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही त्वरीत आपले खाते आधार कार्डशी लिंक करा.

तुम्ही बँकेत जाऊन खात्याला आधारशी लिंक करू शकता. बँकेत तुम्हाला आधार कार्डची एक फोटो कॉपी, तुमची पासबुक घेऊन जावे लागेल. अनेक बँका मेसेजच्या माध्यमातून खात्याला आधार कार्ड लिंक करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून मेसेज बॉक्समध्ये जाऊन UIDआधार नंबर खाते नंबर लिहून 7 56767 पाठवू शकतात. यानंतर त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले जाईल. हे लक्षात असू द्या की जर तुमचा आधार आणि बँकेत दिलेला मोबाइल नंबर वेगळा असेल तर लिंक होणार नाही. याशिवाय, तुम्ही बँक खात्याला तुमच्या जवळच्या एटीएममधूनही आधारशी लिंक करू शकता.

अशी मिळते पाच हजार रुपये काढण्याची सुविधा?
पंतप्रधान जनधन खात्यावर ग्राहकांना 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय, PMJDY खातेही आधार कार्डशी लिंक केले पाहिजे. या योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्देश प्रत्येक कुटुंबासाठी बँक खाते उघडणे हा होता. जन धन योजनेंतर्गत तुम्ही 10 वर्षाखालील मुलाचे खाते देखील उघडू शकता.

जनधन खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे...
आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅनकार्ड, मतदार कार्ड, नरेगा जॉब कार्ड, ऑथिरिटीने दिलेले पत्र, ज्यामध्ये नाव, पत्ता आणि आधार क्रमांकाचा उल्लेख असावा.

नवीन खाते उघडण्यासाठी हे काम करा...
तुम्हाला नवीन जनधन खाते उघडायचे असल्यास जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही हे काम सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत फॉर्म भरावा लागेल. त्यामध्ये नाव, मोबाइल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय / नोकरी आणि वार्षिक उत्पन्न आणि तुमच्यावर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव  किंवा शहर कोड इत्यादी माहिती द्यावी लागेल.
 

Web Title: pradhan mantri jan dhan account sbi jan dhan account is not linked from aadhar then you will not get benefits of 1 lakh 30 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.