नवी दिल्ली - तुमच्या जुन्या नोकरीतील पीएफचे पैसे अडकले आहेत? किंवा जुन्या पीएफ खात्याचा नंबर माहीत नसल्यामुळे ते पैसे विसरून गेला आहात? तर आता काळजी करण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) अशा सदस्यांसाठी ‘ई-प्राप्ती’ नावाचे विशेष वेब पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता कोट्यवधी कर्मचाऱ्यांना त्यांची अनेक वर्षांपासून बंद असलेली खाती पुन्हा सुरू करता येणार आहेत. हे नवीन पोर्टल पूर्णपणे ‘आधार’ आधारित पडताळणीवर काम करेल.
काय आहे ‘ई-प्राप्ती’ पोर्टल?
या पोर्टलचे पूर्ण नाव ‘एम्प्लॉई प्रॉविडेंट फंड आधार-बेस्ड ॲक्सेस पोर्टल फॉर ट्रॅकिंग इनऑपरेटिव्ह अकाऊंट्स’ असे आहे. सुरुवातीला ओळखपत्राचे पुरावे आहेत, त्यांना याचा लाभ मिळेल. मात्र, दुसऱ्या टप्प्यात जुन्या खात्याचा तपशील नसेल त्यांनीही सुविधा दिली जाईल.
पोर्टलचा फायदा कुणाला?
खाती अनेक वर्षांपासून बंद आहेत किंवा ज्यांना जुना पीएफ नंबर आठवत नाही.
आधार पडताळणीद्वारे बंद खाते शोधता येणार आणि सक्रिय करता येणार.
खाते यूएएनशी जोडल्यानंतर सदस्यांना आपली माहिती अद्ययावत करता येईल.
यूएएन नंबर नसलेली जुनी खातीही आता मुख्य खात्याला जोडता येतील.
