lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytm चे शेअर्स दुसऱ्या दिवशीही आपटले; गुंतवणूकदारांना मोठा झटका

Paytm चे शेअर्स दुसऱ्या दिवशीही आपटले; गुंतवणूकदारांना मोठा झटका

Paytm मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा झटका लागला आहे. गुरूवारी लिस्टिंगनंतरच शेअर्समध्ये २० टक्क्यांचं लोअर सर्किट लावण्यात आलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:18 PM2021-11-22T20:18:25+5:302021-11-22T20:18:50+5:30

Paytm मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा झटका लागला आहे. गुरूवारी लिस्टिंगनंतरच शेअर्समध्ये २० टक्क्यांचं लोअर सर्किट लावण्यात आलं होतं.

paytm stocks dropped on second days big shock to investors target price no 1200 according to broakrage firm | Paytm चे शेअर्स दुसऱ्या दिवशीही आपटले; गुंतवणूकदारांना मोठा झटका

Paytm चे शेअर्स दुसऱ्या दिवशीही आपटले; गुंतवणूकदारांना मोठा झटका

Paytm मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा झटका लागला आहे. पेटीएमच्या शेअर्सना गुरूवारी लिस्टिंगनंतरच २० टक्क्यांचं लोअर सर्किट लावण्यात आलं होतं. यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका लागला आहे. घरणीचं सत्र सोमवारीही कायम राहिलं होतं. पेटीएमचा शेअर सोमवारी १४ टक्क्यांच्या घसरणीसह १३४३.७० रूपयांवर ट्रेड करत होता.लिस्टिंगनंतर २ दिवसांमध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये ३५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

लिस्टिंगच्याच दिवशी मुंबई शेअर बाजावर पेटीएमची पॅरेंट कंपनी One97 कम्युनिकेशन्सचं मार्केट कॅप १,१०,४०७ कोटी रूपयांवर पोहोचला. सोमवारी झालेल्या घसरणीनंतर कंपनीचं मार्केट कॅप ८६ हजार कोटी रूपयांवर गेलं. पेटीएमच्या शेअरची इश्यू प्राईज ही २१५० रूपये होते. इश्यू प्राईजवर पेटीएमचं मार्केट कॅप १.३९ लाख कोटींपेक्षा अधिक होतं होतं.

सीईओंच्या संपत्तीत घट
Paytm चे सीईओ विजय शेखर शर्मा यांची संपत्ती २ सेशन्समध्येच ७८१ मिलियन डॉलर्स पेक्षा अधिक कमी झाली आहे. IPO ओपनिंगपूर्वी कंपनीमध्ये त्यांच्या हिस्स्याचं मूल्य इश्यू प्राईजनुसार २१५६ रूपयांनुसार २.३ अब्ज डॉलर्स होतं. One97 कम्युनिकेशन्समध्ये शर्मा यांचा हिस्सा ९,१ टक्के होता. शर्मा यांच्याकडे कंपनीनमध्ये २.१ कोटी ऑप्शन्सही आहेत.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॅक्वायरी रिसर्चनं पेटीच्या One97 कम्युनिकेशन्सला अंडरपरफॉर्मन्स रेटिंग दिलं आहे. आपल्या रिपोर्टमध्ये त्यांनी पेटीएमला कॅश बर्निंग मशीन असं संबोधलं आहे. पेटीएमचं व्यवसायावर फोकस कमी आणि डायरेक्शनमध्ये कमतरता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी कंपनीचं टार्गेट प्राईज कमी करून १२०० रूपये केलं आहे. ही किंमत त्यांच्या इश्यू प्राईजच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी कमी आहे.

Web Title: paytm stocks dropped on second days big shock to investors target price no 1200 according to broakrage firm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.