Lokmat Money > बिझनेस न्यूज > Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण

Opening Bell : शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी घसरणीनं झाली. परंतु नंतर त्यात तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान बीएसई सेन्सेक्स १८२ अंकांच्या वाढीसह ७४,४०३.१३ अंकांवर काम करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 09:49 AM2024-05-23T09:49:43+5:302024-05-23T09:49:56+5:30

Opening Bell : शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी घसरणीनं झाली. परंतु नंतर त्यात तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान बीएसई सेन्सेक्स १८२ अंकांच्या वाढीसह ७४,४०३.१३ अंकांवर काम करत होता.

Opening Bell Sensex Nifty up SBI shines big drop in PowerGrid share market | Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण

Opening Bell :  शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी घसरणीनं झाली. परंतु नंतर त्यात तेजी दिसून आली. कामकाजादरम्यान बीएसई सेन्सेक्स १८२ अंकांच्या वाढीसह ७४,४०३.१३ अंकांवर तर निफ्टी ८५ अंकांच्या तेजीसह २२,६८३.६५ अंकांवर कामकाज करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामात निफ्टी फार्मा निर्देशांक वगळता सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये कार्यरत होते. 
 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात एसबीआय लाइफ, एसबीआय, अॅक्सिस बँक, ओएनजीसी, एचडीएफसी लाइफ, इंडसइंड बँक आणि बीपीसीएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती, तर पॉवर ग्रिड, सन फार्मा, हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
 

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती
 

इरकॉन इंटरनॅशनल, ओएनजीसी, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, विप्रो लिमिटेड, इंजिनीअर्स इंडिया, एशियन पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. गुरुवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज, आरईसी लिमिटेड, मारुती सुझुकी, आयआरसीटीसी, प्राज इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि अशोक लेलँड यांचे शेअर्स वधारले. तर सेल, नाल्को, हिंदुस्थान झिंक आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरमध्ये सुरुवातीच्या कामकाजादरम्यान घसरण झाली.
 

गुरुवारी प्री ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ३२ अंकांच्या तेजीसह ७४२५३ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी १६ अंकांच्या मजबुतीसह २२६१४ अंकांवर व्यवहार करत होता. गुरुवारी शेअर बाजाराचे कामकाज सामान्य नोटवर सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळत होते.

Web Title: Opening Bell Sensex Nifty up SBI shines big drop in PowerGrid share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.