lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोठं नुकसान...! एक ट्विट अन् इलॉन मस्क यांना बसला कोट्यवधी डॉलर्सचा फटका; जाणून घ्या, काय घडलं?

मोठं नुकसान...! एक ट्विट अन् इलॉन मस्क यांना बसला कोट्यवधी डॉलर्सचा फटका; जाणून घ्या, काय घडलं?

...यामुळे मस्की यांची कंपनी असलेल्या X ला वर्ष अखेरपर्यंत तब्बल 75 मिलियन डॉलर अर्थात 6 अब्ज रुपयांहून अधिकचे नुकसान होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 07:11 PM2023-11-25T19:11:34+5:302023-11-25T19:12:46+5:30

...यामुळे मस्की यांची कंपनी असलेल्या X ला वर्ष अखेरपर्यंत तब्बल 75 मिलियन डॉलर अर्थात 6 अब्ज रुपयांहून अधिकचे नुकसान होऊ शकते.

One tweet and Elon Musk is hit with millions of dollars Know what happened | मोठं नुकसान...! एक ट्विट अन् इलॉन मस्क यांना बसला कोट्यवधी डॉलर्सचा फटका; जाणून घ्या, काय घडलं?

मोठं नुकसान...! एक ट्विट अन् इलॉन मस्क यांना बसला कोट्यवधी डॉलर्सचा फटका; जाणून घ्या, काय घडलं?

उद्योगपती इलॉन मस्क यांना एक ट्विट करणे प्रचंड महागात पडले आहे. यामुळे मस्की यांची कंपनी असलेल्या X ला वर्ष अखेरपर्यंत तब्बल 75 मिलियन डॉलर अर्थात 6 अब्ज रुपयांहून अधिकचे नुकसान होऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, अनेक मोठे ब्रँड्स त्यांचे मार्केटिंग कॅम्पेन थांबवत आहेत. खरे तर, हे सर्व इलॉन मस्क यांच्या केवळ एका पोस्टमुळे घडले आहे. इलॉन मस्क यांनी नुकतेच एका यहुदीं विरोधातील सोशल मीडिया पोस्टचे समर्थन केले होते.

मस्क यांच्यावर यहुदी विरोधाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकन सरकारनेही याचा निशेध केला होता. न्यूयॉर्क टाइम्सने ने या आठवड्यात पाहिलेल्या अंतर्गत दस्तऐवजानुसार, एयरबीएनबी, अमॅझॉन, कोका-कोला, मायक्रोसॉफ्ट आणि यांच्या सारख्या इतरही अनेक कंपन्यांनी 'एक्स'वरील आपल्या जाहिराती थांबवल्या आहेत अथवा थांबवण्यावर विचार करत आहेत.

एक्सनं भरला खटला - 
एक्सने मीडिया मॅटर्स या ना-नफा संस्थेविरोधात खटला दाखल केला आहे. यात, संबंधित संस्थेने एका रिपोर्टमध्ये प्लॅटफॉर्मची बदनामी केल्याचा युक्तीवाद करण्यात आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हे दस्तएवज एक्सच्या विक्री टीमचे आहेत आणि या महिन्यात झालेल्या सर्व जाहिरातींच्या नुकसानाच्या परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यात, आधीच जाहिराती थांबवलेल्या, तसेच ज्या कंपन्या असे करू शकता, त्यांचाही समावेश आहे. 

Web Title: One tweet and Elon Musk is hit with millions of dollars Know what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.