Ola Electric Stock Price: नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ सुरू होताच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी NSE वर हा शेअर ₹२२.८० वर बंद झाला होता, जो आता सुमारे ₹३८.१० प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या महिन्यातच या शेअरमध्ये ६५% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.
या वाढीनंतर बाजारात, ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सचा सर्वात वाईट काळ संपला आहे का आणि आता यात पुन्हा रि-रेटिंग होऊ शकते का, अशा चर्चा सुरू आहेत. ९ ऑगस्ट २०२४ रोजी लिस्टिंगनंतर या शेअरमध्ये जोरदार तेजी आली होती. मात्र त्यानंतर घसरणीचं वातावरण निर्माण झालं आणि हा ‘सेल’ रॅलीचा स्टॉक बनला. गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आणि मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
तेजीमागील प्रमुख कारणं
तज्ज्ञांच्या मते, ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समधील वाढीमागे काही महत्त्वाची कारणं आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सुधारणा झाल्यानं कंपनीला फायदा झाला आहे. तसंच बॅटरी आणि गीगाफॅक्टरी संदर्भातील सकारात्मक बातम्यांनीही या शेअरमध्ये पुन्हा ऊर्जा निर्माण केली आहे. यामुळे संपूर्ण EV क्षेत्राबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
टेक्निकल चार्ट काय सांगतो?
चॉइस इंटरनॅशनलचे रिसर्च अॅनालिस्ट आकाश शाह यांच्या मते, ओला इलेक्ट्रिकचा शेअर २०, ५० आणि १०० EMA पातळी पार करत पुढे गेला आहे. दीर्घकाळ चाललेल्या डाउनट्रेंडनंतर हे ट्रेंड रिव्हर्सलचं संकेत मानलं जात आहे. RSI सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये आहे, याचा अर्थ तेजी कायम असली तरी थोडा स्टॉप येऊ शकतो.
टार्गेट प्राइस आणि महत्त्वाचे स्तर
चॉइस इंटरनॅशनलच्या मते, जर हा शेअर ₹४२ च्या वर टिकून राहिला, तर तो ₹४८ ते ₹५२ पर्यंत जाऊ शकतो. तर खाली येताना ₹३६ हा तात्काळ सपोर्ट असून ₹३२ हा मजबूत स्टॉप-लॉस स्तर मानला जात आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
