Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > निफ्टीचा मिडकॅप-स्मॉलकॅप 'ऑल टाईम हाय'वर; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीसह बंद

निफ्टीचा मिडकॅप-स्मॉलकॅप 'ऑल टाईम हाय'वर; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीसह बंद

Stock Market Closing On 30 July 2024: मंगळवारी शेअर बाजार थोड्या तेजीसह बंद झाला. निर्देशांक फ्लॅट राहिला असला तरी काही क्षेत्रांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. एनर्जी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑटो आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:08 IST2024-07-30T16:07:51+5:302024-07-30T16:08:08+5:30

Stock Market Closing On 30 July 2024: मंगळवारी शेअर बाजार थोड्या तेजीसह बंद झाला. निर्देशांक फ्लॅट राहिला असला तरी काही क्षेत्रांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. एनर्जी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑटो आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी राहिली.

Nifty Midcap Smallcap at All Time High Sensex Nifty also closed higher Stock Market Closing On 30 July 2024 | निफ्टीचा मिडकॅप-स्मॉलकॅप 'ऑल टाईम हाय'वर; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीसह बंद

निफ्टीचा मिडकॅप-स्मॉलकॅप 'ऑल टाईम हाय'वर; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीसह बंद

Stock Market Closing On 30 July 2024: मंगळवारी शेअर बाजार थोड्या तेजीसह बंद झाला. निर्देशांक फ्लॅट राहिला असला तरी काही क्षेत्रांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. एनर्जी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑटो आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी राहिली. आजच्या सत्रातही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सचा उत्साह जास्त होता. व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स ९९ अंकांनी वधारून ८१,४५५ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१ अंकांनी वधारून २४,८५७ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

सेन्सेक्सच्या ३० पैकी १६ शेअर्स वधारले तर १४ घसरले. तर निफ्टी ५० चे शेअर २० तेजीसह बंद झाले तर ३० शेअर्समध्ये घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात टाटा मोटर्स ३.५८ टक्के, एनटीपीसी ३.२२ टक्के, पॉवर ग्रिड १.९७ टक्के, एशियन पेंट्स १.६० टक्के, टायटन १.५५ टक्के, इंडसइंड बँक १.४० टक्के, बजाज फायनान्स १.३४ टक्के, मारुती ०.९९ टक्क्यांनी वधारुन बंद झाले. सन फार्मा १.४२ टक्के, आयटीसी १.१९ टक्के, एचयूएल ०.९३ टक्के, भारती एअरटेल ०.६३ टक्के, रिलायन्स ०.६२ टक्क्यांनी घसरले.

भारतीय शेअर बाजारातील तेजीचे श्रेय एनर्जी, कन्झुमर ड्युरेबल, ऑटो, बँकिंग, मेटल, मीडिया, रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्सना जाते. तर आयटी, फार्मा, हेल्थकेअर, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स घसरले. मिडकॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक ५८,७८२ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर ०.४४ टक्क्यांच्या वाढीसह आजवरच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी वाढ दिसून आली. निफ्टीच्या स्मॉलकॅप निर्देशांकानेही आजच्या सत्रात १९,२५१ अंकांचा उच्चांक गाठला.

मार्केट कॅप वाढलं

शेअर बाजार तेजीसह बंद झाल्यानं आणि विशेषत: मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे मार्केट व्हॅल्यूमध्ये वाढ झाली आहे. बीएसईमध्ये लिस्टेड शेअर्सचे बाजारमूल्य ४६०.९९ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं, जे मागील सत्रात ४५९.९२ लाख कोटी रुपये होतं. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.०७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Web Title: Nifty Midcap Smallcap at All Time High Sensex Nifty also closed higher Stock Market Closing On 30 July 2024