Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI YONO द्वारे ऑनलाइन उघडा NPS खाते; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SBI YONO द्वारे ऑनलाइन उघडा NPS खाते; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

National Pension Scheme : या पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही खाते उघडू शकता. ऑनलाइन खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि बचत खाते असणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 03:26 PM2022-03-28T15:26:37+5:302022-03-28T15:28:10+5:30

National Pension Scheme : या पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही खाते उघडू शकता. ऑनलाइन खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि बचत खाते असणे आवश्यक आहे.

national pension scheme if you want to open online account in yono sbi app follow this process | SBI YONO द्वारे ऑनलाइन उघडा NPS खाते; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SBI YONO द्वारे ऑनलाइन उघडा NPS खाते; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : सेवानिवृत्तीनंतर लोकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवते. त्यापैकी एका योजनेचे नाव आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच NPS. ही एक सरकारी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करून निवृत्तीनंतर मोठा निधी मिळतो. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार गुंतवणूक करू शकता.

दरम्यान, या पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही खाते उघडू शकता. ऑनलाइन खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि बचत खाते असणे आवश्यक आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने NPS खात्याची माहिती दिली आहे. याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करताना बँकेने म्हटले आहे की, पेन्शन खात्याचे टेन्शन आहे का? YONO SBI च्या मदतीने, सहजपणे NPS खाते उघडा, जे डिजिटल सेवेद्वारे तुमचे काम सोपे करते. 

काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे काम सोपे करू शकता. जर तुम्हाला तुमचे खाते NPS खात्यात उघडायचे असेल, तर तुम्ही YONO SBI च्या मदतीने हे काम सहज करू शकता. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही YONO SBI च्या मदतीने नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPS कसे उघडू शकता.

YONO SBI अॅपद्वारे असे उघडा NPS खाते...
- सर्वात आधी YONO SBI अॅप उघडा.
- येथे तुम्ही Investment सेक्शनमध्ये जा.
- त्यानंतर NPS खाते उघडण्याच्या सेक्शनवर क्लिक करा.
- ई-सर्व्हिसेस ऑप्शनवर क्लिक करून NPS रजिस्टेशनचा ऑप्शन निवडा.
- याशिवाय तुम्ही तुमच्या घराजवळील SBI ब्रँचचा ऑप्शनही निवडू शकता.
- येथे तुम्हाला रेजिस्ट्रेशन फॉर्मवर नाव, पत्ता, आधार क्रमांक, पॅन क्रमांक इत्यादी सर्व आवश्यक माहिती सबमिट करावी लागेल.
- यानंतर तुमचे NPS खाते उघडले जाईल.

NPS खात्याची महत्त्वाची माहिती-
या योजनेत गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदाराला चक्रवाढीच्या आधारे परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकर गुंतवणूकदाराला कलम 80CCD(1B) अंतर्गत 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.

Web Title: national pension scheme if you want to open online account in yono sbi app follow this process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.