Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मिझोराममध्ये आॅनलाईन शॉपिंगला पसंती

मिझोराममध्ये आॅनलाईन शॉपिंगला पसंती

ख्रिसमसच्या काळात ईशान्येकडील मिझोरामच्या बाजारापेठांमध्ये ग्राहकांची मोठे रेलचेल असते. मात्र, यंदा ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही बाजारात नेहमीसारखी गर्दी दिसत नाही.

By admin | Updated: December 8, 2014 02:03 IST2014-12-08T02:03:16+5:302014-12-08T02:03:16+5:30

ख्रिसमसच्या काळात ईशान्येकडील मिझोरामच्या बाजारापेठांमध्ये ग्राहकांची मोठे रेलचेल असते. मात्र, यंदा ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही बाजारात नेहमीसारखी गर्दी दिसत नाही.

Mizoram likes online shopping | मिझोराममध्ये आॅनलाईन शॉपिंगला पसंती

मिझोराममध्ये आॅनलाईन शॉपिंगला पसंती

ऐझवाल : ख्रिसमसच्या काळात ईशान्येकडील मिझोरामच्या बाजारापेठांमध्ये ग्राहकांची मोठे रेलचेल असते. मात्र, यंदा ख्रिसमस काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही बाजारात नेहमीसारखी गर्दी दिसत नाही. अधिकतर लोक आॅनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.
ख्रिश्चनबहुल मिझोराममध्ये आता अधिकाधिक लोक इंटरनेटच्या मदतीने वस्तूंची खरेदी करण्यास पसंती देत आहेत. एका अंदाजानुसार, आॅक्टोबरमध्ये आॅनलाईन उलाढालीद्वारे १८,००० पार्सलचे वितरण करण्यात आले. याचे बाजारमूल्य ८७.४७ लाख रुपये आहे. जोवी डॉट कॉम ही आॅनलाईन साईट एका स्थानिक तरुणांद्वारे चालविली जाते. यावरून हे स्पष्ट होते की, मिझोरामचे लोक केवळ आॅनलाईन खरेदीस प्राधान्य देत नाहीत तर याचा एक रोजगार संधी म्हणूनही वापर करीत आहेत. ख्रिसमस जसाजसा जवळ येत आहे तसे राजधानीत कुरिअर कंपन्यांच्या दुकानातील रेलचेल सरासरीच्या कित्येक पट वाढली आहे.
मिझोराम कुरिअर संघटनेच्या उपाध्यक्षांनी सांगितले की, ‘आम्ही डाकिया डाक लाया’ ही भूमिका पार पाडत आहोत. आॅनलाईन शॉपिंग हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग झाला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Mizoram likes online shopping