lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्योगचक्राला गतीसाठी ‘लोकमत’चे खास वेबिनार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांचे विचार

उद्योगचक्राला गतीसाठी ‘लोकमत’चे खास वेबिनार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांचे विचार

देशाच्या जीडीपीत १४.३ टक्के सहभाग असलेले महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून औद्योगिकीकरणातही अव्वल आहे. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्राला आपल्या लौकिकानुसार सिंहाचा वाटा उचलावा लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 06:51 AM2020-05-14T06:51:51+5:302020-05-14T20:11:13+5:30

देशाच्या जीडीपीत १४.३ टक्के सहभाग असलेले महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून औद्योगिकीकरणातही अव्वल आहे. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्राला आपल्या लौकिकानुसार सिंहाचा वाटा उचलावा लागेल.

Lokmat's special webinar to speed up the industrial cycle, Thoughts of dignitaries including Industry Minister Subhash Desai | उद्योगचक्राला गतीसाठी ‘लोकमत’चे खास वेबिनार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांचे विचार

उद्योगचक्राला गतीसाठी ‘लोकमत’चे खास वेबिनार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मान्यवरांचे विचार

मुंबई : कोरोनामुळे ढासळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. देशाच्या जीडीपीत १४.३ टक्के सहभाग असलेले महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून औद्योगिकीकरणातही अव्वल आहे. त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्राला आपल्या लौकिकानुसार सिंहाचा वाटा उचलावा लागेल. मात्र, कोरोनाच्या दुष्टचक्रात थंडावलेल्या उद्योगचक्राला पुन्हा गती देण्यासाठी आपण तयार आहोत का? त्यासाठी आपल्याकडे कोणता कृती आराखडा आहे? यांसारखे असंख्य मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यावर मार्गदर्शन मिळविण्याची संधी 'बॅलेंसिंग प्रेझेंट विथ फ्यूचर-अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र' या वेबिनारच्या माध्यमातून 'लोकमत'ने आपल्या वाचकांसाठी उपलब्ध केली आहे. या वेबिनारमध्ये मार्गदर्शनासाठी येणारे प्रमुख अतिथी आहेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई. लोकमत समूहाच्या ह्यपुनश्च भरारी - आव्हाने आणि संधीह्ण अंतर्गत होणाऱ्या या विशेष वेबिनार सीरीजमधले हे वेबिनार १५ मे रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह लोकमत माध्यम समूहाचे एडिटर इन चिफ आणि राज्याचे माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा, बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हणुमंत गायकवाड, विको लॅबोरेटरीजचे संजीव पेंढारकर, एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे हे मान्यवर यात मार्गदर्शन करतील.


पंतप्रधानांनी जाहीर केलेले पॅकेज देशाच्या सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. आत्मनिर्भरतेला प्राधान्य देत स्वावलंबी भारत घडविण्याची प्रेरणा त्यातून देण्यात आली आहे. त्यानंतर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या पॅकेजच्या सविस्तर मांडणीतून सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. औद्योगिकीकरणात अव्वल असलेला महाराष्ट्र हा देशाचा मुकुटमणी आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी केलेल्या आत्मनिर्भर आणि स्वदेशीच्या आवाहनाला राज्याने प्रभावी पद्धतीने प्रतिसाद द्यायला हवा. केंद्र सरकारशी समन्वय साधत महाराष्ट्राने सद्य:स्थितीचा जास्तीतजास्त फायदा करून घेण्यासाठी मुसंडी मारायला हवी. ती कशी मारायची, यासाठी या वेबिनारमध्ये मान्यवरांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल.

रजिस्ट्रेशनसाठी लिंक https://bit.ly/3bqBWiC
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर रजिस्ट्रेशन केले जाईल.
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक आणि अन्य माहिती नोंदणी केलेल्या ई मेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकावर पाठविली जाईल.
 

Web Title: Lokmat's special webinar to speed up the industrial cycle, Thoughts of dignitaries including Industry Minister Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.