lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Lockdown: देशातील सेवाक्षेत्राची घसरण सुरूच; लॉकडाऊनमुळे नवीन काम मिळणे बंदच

Lockdown: देशातील सेवाक्षेत्राची घसरण सुरूच; लॉकडाऊनमुळे नवीन काम मिळणे बंदच

आकुंचनाचा सलग चौथा महिना, सेवा क्षेत्रातील अनेक आस्थापनांनी आपल्या इनपूट खर्चामध्ये कपात झाल्याचे सांगितले आहे. सलग तिसऱ्या महिन्यामध्ये ही कपात झाली आहे. त्याचप्रमाणे नवीन काम फारसे येत नसल्याने सेवा क्षेत्रामध्ये घट झालेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:11 AM2020-07-04T02:11:46+5:302020-07-04T02:12:11+5:30

आकुंचनाचा सलग चौथा महिना, सेवा क्षेत्रातील अनेक आस्थापनांनी आपल्या इनपूट खर्चामध्ये कपात झाल्याचे सांगितले आहे. सलग तिसऱ्या महिन्यामध्ये ही कपात झाली आहे. त्याचप्रमाणे नवीन काम फारसे येत नसल्याने सेवा क्षेत्रामध्ये घट झालेली आहे.

Lockdown: The country's service sector continues to decline; Lockdown doesn't stop you from getting a new job | Lockdown: देशातील सेवाक्षेत्राची घसरण सुरूच; लॉकडाऊनमुळे नवीन काम मिळणे बंदच

Lockdown: देशातील सेवाक्षेत्राची घसरण सुरूच; लॉकडाऊनमुळे नवीन काम मिळणे बंदच

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या सेवाक्षेत्राला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. नवीन काम मिळत नसल्याने या क्षेत्राची घसरण सलग चौथ्या महिन्यामध्ये कायम आहे.

आयएचएस मार्किट इंडिया सर्व्हिसेसने देशातील सेवा क्षेत्राच्या जून महिन्याचा आढावा जाहीर केला आहे. त्यानुसार सेवा क्षेत्राचा परचेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) हा ३३.७ एवढा आला आहे. मे महिन्यामध्ये हा पीएमआय अवघा १२.६ होता. त्यामध्ये वाढ झाली असली तरी
ती समाधानकारक नाही. पीएमआय ५० पेक्षा अधिक असल्यास त्या क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याचे मानले जाते. देशाच्या सेवा क्षेत्रामध्ये असलेल्या रोजगाराच्या संधी जून महिन्यामध्ये कमी झाल्या आहेत. अनेक आस्थापनांमध्ये पुरेसे काम नसल्याने रोजगार घटला आहे. काही आस्थापना या वाईट स्थितीमुळे बंदच ठेवण्यात आल्या आहेत, तर काही आस्थापनांचे कर्मचारी बाहेर पडण्यावर असलेल्या निर्बंधांमुळे आस्थापनांमध्ये पोहोचू शकत नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सेवा क्षेत्रातील अनेक आस्थापनांनी आपल्या इनपूट खर्चामध्ये कपात झाल्याचे सांगितले आहे. सलग तिसऱ्या महिन्यामध्ये ही कपात झाली आहे. त्याचप्रमाणे नवीन काम फारसे येत नसल्याने सेवा क्षेत्रामध्ये घट झालेली आहे.

केवळ चार टक्के आस्थापनांमध्ये वाढ
या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या आस्थापनांपैकी बहुसंख्य आस्थापनांनी फारसे काम होत नसल्याचे सांगितले आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी ५९ टक्के आस्थापनांनी मे महिन्यापेक्षा जून महिन्यामध्ये कामकाजामध्ये फारसा बदल नसल्याचे सांगितले आहे. केवळ ४ टक्के आस्थापनांमधील कार्य आणि व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. मात्र ३७ टक्के आस्थापनांमधील काम हे कमी झाल्याचे दिसून आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Lockdown: The country's service sector continues to decline; Lockdown doesn't stop you from getting a new job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.