Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्ज घेता का कर्ज?

कर्ज घेता का कर्ज?

कर्जाला उठाव नसल्यामुळे अनेक बँकांवर कुणी कर्ज घेता का कर्ज अशी याचना करण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त भांडवलामुळे

By admin | Updated: December 5, 2014 02:28 IST2014-12-05T02:28:15+5:302014-12-05T02:28:15+5:30

कर्जाला उठाव नसल्यामुळे अनेक बँकांवर कुणी कर्ज घेता का कर्ज अशी याचना करण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त भांडवलामुळे

Loan Loans? | कर्ज घेता का कर्ज?

कर्ज घेता का कर्ज?

नवी दिल्ली : कर्जाला उठाव नसल्यामुळे अनेक बँकांवर कुणी कर्ज घेता का कर्ज अशी याचना करण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त भांडवलामुळे खाजगी क्षेत्रातील बड्या बँका असलेल्या आयसीआयसीआय आणि एचडीएफसी यांनी आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियासह अनेक बँकांनी या आधीच व्याजदरात अशी कपात केली आहे.
आयसीआयसीआय बँकेने ३९0 दिवस ते २ वर्षे या कालावधींच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.२५ टक्का कपात केली आहे. हा कर आता ८.७५ टक्के झाला आहे. एचडीएफसी बँकेने ४६ दिवस ते १ वर्ष या कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.२५ ते 0.५0 टक्का कपात केली आहे. येस बँकेकडूनही व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत येस बँकेचे मुख्य वित्त अधिकारी रजत मोंगा यांनी दिले.
एचडीएफसी बँकेचे खजिनदार आशिष पार्थसारथी यांनी सांगितले की, बँकांकडील ठेवींचा ओघ अलीकडे वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत कर्जाची मागणी कमी आहे. त्यामुळे व्याजदरात कपात करणे आम्हाला भाग पडले आहे. यंदाच्या संपूर्ण आर्थिक वर्षात भारतीय बँकिंग क्षेत्राची वाढ कर्ज मागणीच्या तुलनेत ३ ते ५ टक्क्यांनी अधिक आहे. याचा परिणाम म्हणून बँकांकडे पैसा पडून आहे. या अतिरिक्त निधीचे काय करारचे हा बँकांसमोरील प्रश्न आहे. अशा परिस्थितीत ठेवींचा ओघ कमी करणे बँकांना भाग आहे. त्यासाठीच ठेवींवरील व्याज कमी करण्यात येत आहे. अलीकडे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर्जपुरवठ्याची वाढ कमजोर असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Loan Loans?