Lokmat Money > बिझनेस न्यूज > माेबाइलवरील व्यवहारांवर येणार मर्यादा? अंमलबजावणीबाबत लवकरच निर्णय

माेबाइलवरील व्यवहारांवर येणार मर्यादा? अंमलबजावणीबाबत लवकरच निर्णय

थर्ड पार्टी युपीआय व्यवहारांवर सध्या काेणतीही मर्यादा नाही. त्यामुळे युपीआय व्यवहारांमध्ये गुगल पे आणि फाेन पे यांची हिस्सेदारी ८०%वर पाेहाेचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:14 PM2022-11-22T13:14:29+5:302022-11-22T13:18:04+5:30

थर्ड पार्टी युपीआय व्यवहारांवर सध्या काेणतीही मर्यादा नाही. त्यामुळे युपीआय व्यवहारांमध्ये गुगल पे आणि फाेन पे यांची हिस्सेदारी ८०%वर पाेहाेचली आहे.

Limitations will be on mobile transactions Decision on implementation soon | माेबाइलवरील व्यवहारांवर येणार मर्यादा? अंमलबजावणीबाबत लवकरच निर्णय

माेबाइलवरील व्यवहारांवर येणार मर्यादा? अंमलबजावणीबाबत लवकरच निर्णय

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेत यूपीआय यंत्रणेमुळे माेठी क्रांती घडली. काेणत्याही शुल्काविना क्षणात पैसे हातातील माेबाइलद्वारे ट्रान्स्फर शक्य झाले. दरराेज काेट्यवधी व्यवहार यूपीआयमार्फत हाेतात. मात्र, या यंत्रणेवर गुगल पे आणि फाेन पे यांची मक्तेदारी आली. ती लवकरच माेडीत निघण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम अर्थात एनसीपीआयतर्फे थर्ड पार्टी यूपीआय पेमेंटसाठी एकूण उलाढालीवर ३० टक्क्यांची मर्यादा टाकण्याचा प्रस्ताव आहे. ३१ डिसेंबरपासून त्याची अंमलबाजावणी करण्याची एनसीपीआयची तयारी आहे. याबाबत आरबीआयसाेबत चर्चा सुरू आहे.

- ७३० काेटी ऑक्टाेबरमध्ये व्यवहार झाले
- १२.११ लाख काेटी रुपयांची उलाढाल झाली

गुगल पे, फाेन पेची ८० टक्के हिस्सेदारी
थर्ड पार्टी युपीआय व्यवहारांवर सध्या काेणतीही मर्यादा नाही. त्यामुळे युपीआय व्यवहारांमध्ये गुगल पे आणि फाेन पे यांची हिस्सेदारी ८०%वर पाेहाेचली आहे. त्यामुळे बाजारात त्यांची मक्तेदारी वाढली आहे. त्यामुळे एनसीपीआने त्यावर ३० टक्के मर्यादा टाकण्याचा प्रस्ताव दिला हाेता. 
 

Web Title: Limitations will be on mobile transactions Decision on implementation soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.