lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Fintech वर खास फोकस करतेय LIC, पॉलिसीहोल्डर्सपासून ते एजन्ट्सपर्यंत सर्वांवर होणार परिणाम

Fintech वर खास फोकस करतेय LIC, पॉलिसीहोल्डर्सपासून ते एजन्ट्सपर्यंत सर्वांवर होणार परिणाम

कंपनीकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट डाइव्ह अंतर्गत एका सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 10:37 PM2023-11-26T22:37:38+5:302023-11-26T22:38:49+5:30

कंपनीकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट डाइव्ह अंतर्गत एका सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे...

LIC's special focus on Fintech will impact everyone from policyholders to agents | Fintech वर खास फोकस करतेय LIC, पॉलिसीहोल्डर्सपासून ते एजन्ट्सपर्यंत सर्वांवर होणार परिणाम

Fintech वर खास फोकस करतेय LIC, पॉलिसीहोल्डर्सपासून ते एजन्ट्सपर्यंत सर्वांवर होणार परिणाम

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत नवीन फिनटेक युनिटची शक्यता शोधत आहे. यासंदर्भात, एका मुलाखतीत बोलताना एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की, कंपनीकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट डाइव्ह अंतर्गत एका सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोहंती म्हणाले, आमचे उद्दिष्ट डाइव्हच्या माध्यमाने सर्व भागधारक, ग्राहक, मध्यस्थ आणि मार्केटर्सना सर्वोत्कृष्ट डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे आहे.

ग्राहक संपादनावर असे विशेष फोकस -
मोहंती म्हणाले, डिजिटल ट्रांसफॉरमेशनच्या पहिल्या टप्प्यात ग्राहक अधिग्रहणावर भर दिला जाईल. येणाऱ्या काळात ग्राहक घर बसल्या मोबाइलच्या माध्यमाने एका क्लिकवर एलआयसीच्या सेवा घेऊ शकतील. कंपनीकडून अधिकांश ग्राहक एजेंट्सच्या माध्यमाने जोडले जातात.

तीन ते चार नवे प्रोडक्ट्स लॉन्च करण्याची योजना -
LIC ने चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नव्या पॉलिसीच्या प्रीमियममध्ये डबल डिजिट ग्रोथ मिळविण्यासंदर्भात योजना आखली आहे. या अनुषंगाने येणाऱ्या काही महिन्यांत तीन ते चार नवे प्रोडक्ट्स लॉन्च केले जाऊ शकतात. एलआयसीचे चेअरमन सिद्धार्थ मोहंती यानी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कंपनी एक नवे प्रोडक्ट लॉन्च करू शकते.

काय असेल वैशिष्ट्य - 
या नव्या सर्व्हिसची काही वैशिष्टे सांगताना मोहंती म्हणाले, ही सर्व्हिस निश्चित परतावा प्रदान करेल आणि तसेच मॅच्युरिटीनंतर, आयुष्यभरासाठी विम्याच्या रकमेच्या 10 टक्के मिळत जातील. याशिवाय, कर्ज सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढण्यासारखी सुविधाही, या नव्या सर्व्हिसची वैशिष्ट्ये आहेत, असेही ते म्हणाले.
 

Web Title: LIC's special focus on Fintech will impact everyone from policyholders to agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.