lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC चा गुंतवणूकदारांना झटका, शेअर्समध्ये घसरणीचं सत्र सुरूच; भविष्याबाबत जाणकार म्हणतात…

LIC चा गुंतवणूकदारांना झटका, शेअर्समध्ये घसरणीचं सत्र सुरूच; भविष्याबाबत जाणकार म्हणतात…

वाचा या शेअरच्या भविष्याबद्दल काय म्हणतायत एक्सपर्ट.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 07:42 PM2022-06-06T19:42:32+5:302022-06-06T19:44:45+5:30

वाचा या शेअरच्या भविष्याबद्दल काय म्हणतायत एक्सपर्ट.

lic shares slump to record low of rs 782 45 market cap slips below rs 5 lakh crore know what expert says | LIC चा गुंतवणूकदारांना झटका, शेअर्समध्ये घसरणीचं सत्र सुरूच; भविष्याबाबत जाणकार म्हणतात…

LIC चा गुंतवणूकदारांना झटका, शेअर्समध्ये घसरणीचं सत्र सुरूच; भविष्याबाबत जाणकार म्हणतात…

एलआयसीच्या शेअर्समधील घसरणीचा सत्र आजही कायम आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे शेअर्स आजवरच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. सोमवारी सकाळी एनएसईवर कंपनीचे शेअर 800.25 रुपयांच्या पातळीवर उघडले. दरम्यान, कामकाजाच्या अखेरच्या सत्रात ते शेअर 776.50 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. दरम्यान, यानंतर कंपनीचे मार्केट कॅप देखील 5 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाले आहे. 

सोमवारी सकाळी कंपनीचे मार्केट कॅप 4.98 लाख कोटी रुपयांवर गेले होते. गेल्या पाच सत्रांमध्ये एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. यात तब्बल 6 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. यापूर्वी 949 च्या किमतीवर कंपनीचे बाजार भांडवल 6,00,242 रुपये होते.

17 मे रोजी एलआयसीची सुरूवातही चांगली झाली नव्हती आणि कंपनीचा शेअर बीएसईवर 8.62 टक्क्यांच्या सवलती मूल्यावर लिस्ट झाला होता. सरकारनं याचं मूल्य 949 रुपये प्रति शेअर निश्चित केलं होतं. एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी हे शेअर डिस्काऊंटेड किंमतीवर देण्यात आले होते. एलआयसीचं लिस्टिंग कमकुवत झालं होते. FII ची भागीदारी या स्टॉकमध्ये नाहीच्या बरोबर आहोत. एकदा अँकर गुंतवणूकदारांचा लॉक इन पिरिअड संपला की त्यानंतर आणखी विक्री दिसून येईल. अशातच चौथ्या तिमाहिचे निकाल पाहिल्यावर यात गुंतवणूक करण्यापासून वाचावं, अशी प्रतिक्रिया एसएमसी ग्लोबल सिक्युरिटिजचे रिसर्च सेक्शनचे व्हाईस प्रेसिडेंट सौरभ जैन यांनी दिली. (टीप- कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: lic shares slump to record low of rs 782 45 market cap slips below rs 5 lakh crore know what expert says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.