lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Shark Tank India Ashneer Grover : शार्क टँक इंडिया फेम अशनीर ग्रोव्हर यांनी घेतली लक्झरी कार, आता नंबर प्लेटची चर्चा 

Shark Tank India Ashneer Grover : शार्क टँक इंडिया फेम अशनीर ग्रोव्हर यांनी घेतली लक्झरी कार, आता नंबर प्लेटची चर्चा 

शार्क टँक इंडिया (Shark Tank India) फेम अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 08:45 AM2022-05-25T08:45:44+5:302022-05-25T09:01:51+5:30

शार्क टँक इंडिया (Shark Tank India) फेम अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

latest news know about shark tank fame ashneer grover bought this luxury car the number plate made a lot of headlines | Shark Tank India Ashneer Grover : शार्क टँक इंडिया फेम अशनीर ग्रोव्हर यांनी घेतली लक्झरी कार, आता नंबर प्लेटची चर्चा 

Shark Tank India Ashneer Grover : शार्क टँक इंडिया फेम अशनीर ग्रोव्हर यांनी घेतली लक्झरी कार, आता नंबर प्लेटची चर्चा 

शार्क टँक इंडिया (Shark Tank India) फेम अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. त्यांनी नुकतीच एक नवी कार खरेदी केली. परंतु या कारच्या नंबर प्लेटमुळे ते आता चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांनी आपल्या कारच्या नंबर प्लेटवर आपल्या कारच्या नंबर ऐवजी आपलंच नाव लिहिलं आहे. अशनीर ग्रोव्हर यांनी खरेदी केलेल्या लक्झरी कारचं नाव Mercedes-Maybach S650 आहे. मर्सिडीजची ही लक्झरी कार किती महाग आहे आणि तिची खासियत काय आहे ते जाणून घेऊया.

अशनीर ग्रोव्हर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून मर्सिडीज-मेबॅक S650 चा एक फोटो पोस्ट केला आहे. या कारसोबत ते शेजारी उभे राहून पोझ देताना दिसत आहेत. याशिवाय त्यांनी नवी नंबर प्लेट असं म्हणत कॅप्शनसह एक इमोजीही शेअर केली आहे. दरम्यान, या लक्झरी सेडान कारची किंमत 2.5 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.


इंजिनबद्दल सांगायचं झालं तर या मेबॅक एस क्लास लिमोझिनसोबत कंपनीनं दोन इंजिन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये 4.0 लिटर V8 बाय टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. हे 469 बीएचपी आणि 700 एनएम टॉर्क जनरेट करतं. याच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सिस्टम असून यात AWD सिस्टम आहे. अशनीर ग्रोव्हर यांच्या ताफ्यात अनेक लक्झरी कार्स आहे. या कारशिवाय त्यांच्याकडे ऑडी ए 6, पोर्श केमॅन बेंज आणि टोयोटा इनोव्हासारख्या गाड्या आहेत.

Web Title: latest news know about shark tank fame ashneer grover bought this luxury car the number plate made a lot of headlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.