Lokmat Money > बिझनेस न्यूज > मार्केट A 2 Z: आधी आरोग्य, मग बक्कळ पैसा...; ‘एच’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या उत्तम कंपन्यांविषयी...

मार्केट A 2 Z: आधी आरोग्य, मग बक्कळ पैसा...; ‘एच’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या उत्तम कंपन्यांविषयी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे नेहमी अग्रस्थानी असावे आणि ठेवावे; नंतर पैसा... म्हणूनच इंग्रजीत एक म्हण आहे .. ‘Health is Wealth’...

By पुष्कर कुलकर्णी | Published: November 22, 2022 06:16 PM2022-11-22T18:16:04+5:302022-11-22T18:16:47+5:30

मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे नेहमी अग्रस्थानी असावे आणि ठेवावे; नंतर पैसा... म्हणूनच इंग्रजीत एक म्हण आहे .. ‘Health is Wealth’...

know about the best companies starting with letter h in share market and health first money later check all details | मार्केट A 2 Z: आधी आरोग्य, मग बक्कळ पैसा...; ‘एच’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या उत्तम कंपन्यांविषयी...

मार्केट A 2 Z: आधी आरोग्य, मग बक्कळ पैसा...; ‘एच’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या उत्तम कंपन्यांविषयी...

पुष्कर कुलकर्णी -

शेअर बाजारात आपण जर दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर उत्तम. परंतु जर ट्रेडर्स असाल तर त्याच्या आहारी जाऊन झटपट पैसे कमविण्याचा नादात आपण आपले मानसिक स्वास्थ्य तर बिघडवून घेत नाही ना, याकडे वेळोवेळी आवर्जून पाहावे. कधी फायदा तर कधी तोटा या चक्रात अडकून मनस्वास्थ्य बिघडले तर कितीही पैसा कमवा; तो उतारवयात निरर्थक ठरू शकतो. मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे नेहमी अग्रस्थानी असावे आणि ठेवावे; नंतर पैसा... म्हणूनच इंग्रजीत एक म्हण आहे .. ‘Health is Wealth’...

एचसीएल टेकनॉलॉजीज लि. (HCLT)

१९७६ मध्ये स्थापना झालेली ही कंपनी आयटी क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बीपीओ आणि इन्फ्रा मॅनेजमेंट सर्व्हिस हा कंपनीचा प्रमुख व्यवसाय आहे. जगभरात कंपनी आपली सेवा प्रदान करते.
फेस व्हॅल्यू : रुपये २/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. ११०३/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रु. २ लाख ८७ हजार कोटी
भाव पातळी : वार्षिक हाय रु.१३६०/- आणि लो ८७७/-
बोनस शेअर्स : २००६ ते २०१९ दरम्यान १:१ या प्रमाणात तीन वेळा.
शेअर स्प्लिट :  १:२ या प्रमाणात सन २००० मध्ये
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत या शेअरने तब्बल ७ पट रिटर्न्स दिले आहेत.
भविष्यात संधी : आयटी क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असून कोरोनानंतरच्या काळात सध्या डाऊन फेजमध्ये आहे. येणाऱ्या काळात यातील मंदी दूर होईल. या क्षेत्रातील सर्व चांगल्या कंपन्यांना भविष्यात उत्तम दिवस असतील.

हिंदुस्थान युनिलिव्हर लि (HLL)    

कन्झ्युमर प्रॉडक्ट क्षेत्रातील अत्यंत अग्रेसर अशी कंपनी. आपण दैनंदिन रोज गरजेच्या अनेक वस्तू वापरतो त्यात या कंपनीची अनेक उत्पादने आहेत. उदा. अंगाचा साबण, डिटर्जंट पावडर, भांडी घासण्याचा बार, परफ्युम, चहा, कॉफी, इत्यादी. हिंदुस्थान युनिलिव्हरचे अनेक ब्रॅण्ड्स मॉल आणि किराणा दुकानात विक्री केले जातात.
फेस व्हॅल्यू : रु. १/- प्रतिशेअर
सध्याचा भाव : रु. २४८३/- प्रतिशेअर
मार्केट कॅप : रुपये ५ लाख ९० हजार कोटी
भाव पातळी  : वार्षिक हाय रु. २७३४/- 
आणि लो - १९०१/-
बोनस शेअर्स : ४ वेळा सन १९९१ पूर्वी
शेअर स्प्लिट : १:१० या प्रमाणात सन २००० मध्ये
रिटर्न्स : गेल्या दहा वर्षांत पाच पटींपेक्षा 
अधिक रिटर्न्स मिळाले आहेत.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : उत्तम. कंपनीचा व्यवसाय दैनंदिन गरजेच्या वस्तू उत्पादन आणि विक्री यात असल्याने अशा व्यवसायास मरण नाही. यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीवर उत्तम परतावा देण्याची क्षमता या शेअरमध्ये आहे.

हिंदाल्को इंडस्ट्रीज लि. (HALC)

मेटल क्षेत्रातील एक चांगली कंपनी. ॲल्युमिनियम आणि कॉपर या धातूंपासून विविध उत्पादने बनविणे ज्यात रॉड्स, शीट्स, वायर, इत्यादी तसेच विविध क्षेत्रांतील उत्पादनांसाठी पॅकेजिंग म्हणून वापरले जाणारे मटेरिअल बनविणे हा प्रमुख व्यवसाय. याचा वापर प्रामुख्याने इलेक्ट्रिनिक, इलेक्ट्रिक, फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि किचन पदार्थ यासाठी होतो.
फेस व्हॅल्यू : रुपये १/-
सध्याचा भाव : रु. ४३९/-
मार्केट कॅप :  ९४ हजार कोटी रुपये.
भाव पातळी : वार्षिक हाय ₹६३६/- आणि लो ₹३९४/-
बोनस शेअर्स : चार वेळा सन १९८२ ते १९९६ दरम्यान. नंतर नाही.
शेअर स्प्लिट : १:१० सन २००५ मध्ये
रिटर्न्स : गेल्या १० वर्षांत चौपट रिटर्न्स मिळाले आहेत.
डिव्हिडंड : भागधारकांना डिव्हिडंड दिला जातो.
भविष्यात संधी : चांगली. कंपनीचा व्यवसाय मेटल क्षेत्रात असून हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. ॲल्युमिनिम हा धातू थेट घराघरांत आणि अनेक व्यवसायात वापरला जातो. यामुळे या कंपनीस चांगले भवितव्य राहू शकते.

H गुंतवणुकीसाठी इतर कंपन्यांची नावे: हिरो मोटोक्रॉप, हॅवेल्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी (गृह कर्ज), हिंदुस्थान एरोनॉटिक्स, इत्यादी चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता.

टीप : हे सदर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक असून कंपनीच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीची कोणतीही हमी देत नाही.

- pushkar.kulkarni@lokmat.com
Follow : www.lokmat.com/author/pushkarkulkarni

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


 

Web Title: know about the best companies starting with letter h in share market and health first money later check all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.