lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jet Airways पुन्हा आकाशात भरारी घेणार; कंपनीला मिळाला नवीन मालक...

Jet Airways पुन्हा आकाशात भरारी घेणार; कंपनीला मिळाला नवीन मालक...

Jet Airways Transfer Of Ownership : कधीकाळी भारतीय विमान व्यवसायात जेट एअरवेजचे वर्चस्व होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 06:47 PM2024-03-12T18:47:02+5:302024-03-12T18:47:12+5:30

Jet Airways Transfer Of Ownership : कधीकाळी भारतीय विमान व्यवसायात जेट एअरवेजचे वर्चस्व होते.

Jet Airways NCLAT: Jet Airways to take off again; company got a new owner | Jet Airways पुन्हा आकाशात भरारी घेणार; कंपनीला मिळाला नवीन मालक...

Jet Airways पुन्हा आकाशात भरारी घेणार; कंपनीला मिळाला नवीन मालक...

Jet Airways Transfer Of Ownership : गेल्या काही वर्षांपासून अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज (Jet Airways) बाबत मंगळवारी मोठी बातमी समोर आली आहे. या विमान कंपनीला नवीन मालक मिळाला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLAT) ने जेट एअरवेजचे नियंत्रण जालन कॅलरॉक कंसोर्टियमकडे (Jalan Kalrock Consortium) हस्तांतरित करण्याचा निर्णय कायम ठेवत त्याला मान्यता दिली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल कंपनी लॉ लॉ ट्रिब्युनलने जेट एअरवेजला जालान-कॅलरॉक कन्सोर्टियम (JKC) ला देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. NCLAT ने जानेवारी 2023 मध्ये मालकी हस्तांतरणास मान्यता दिली होती. मंगळवारी हा निर्णय कायम ठेवत NCLAT ने कर्जदारांना 90 दिवसांच्या आत हस्तांतरण करण्याचे निर्देश दिले आहेत. या विंडोच्या शेवटी JKC ला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र प्राप्त करण्यास सांगितले आहे.

कधीकाळी जेट एअरवेजचे वर्चस्व...
नरेश गोयल (Naresh Goyal) यांनी 90 च्या दशकात जेट एअरवेज इंडिया लिमिटेडची सुरुवात केली होती. स्थापनेनंतर जेट एअरवेज एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपन्यांपैकी एक बनली होती. तेव्हा कंपनीच्या ताफ्यात एकूण 120 विमाने होती. पण नंतर कंपनीचा व्यवसाय कर्जात अडकली आणि अशा टप्प्यावर पोहोचला की, 17 एप्रिल 2019 रोजी कंपनीची उड्डाणे बंद करण्यात आली. आर्थिक संकटामुळे जेट एअरवेजला आपले कामकाज बंद करावे लागले. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने या विमान कंपनीला कर्ज दिले होते, म्हणून बँकेने NCLT मुंबईसमोर कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू केली होती.

 

Web Title: Jet Airways NCLAT: Jet Airways to take off again; company got a new owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.