Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तिहारच्या कैद्यांना विम्याचे कवच

तिहारच्या कैद्यांना विम्याचे कवच

तिहार तुरुंगातील कैद्यांना आयुर्विमा आणि अपघात विम्याचे कवच लाभणार असून, तुरुंग प्रशासनाने इंडियन बँकेच्या सहकार्याने जनधन योजनेतहत कैद्यांचे बचत खाते उडण्याचा निर्णय घेतला आहे.

By admin | Updated: December 22, 2014 04:38 IST2014-12-22T04:37:42+5:302014-12-22T04:38:02+5:30

तिहार तुरुंगातील कैद्यांना आयुर्विमा आणि अपघात विम्याचे कवच लाभणार असून, तुरुंग प्रशासनाने इंडियन बँकेच्या सहकार्याने जनधन योजनेतहत कैद्यांचे बचत खाते उडण्याचा निर्णय घेतला आहे.

Insurance cover for Tihar prisoners | तिहारच्या कैद्यांना विम्याचे कवच

तिहारच्या कैद्यांना विम्याचे कवच

नवी दिल्ली : तिहार तुरुंगातील कैद्यांना आयुर्विमा आणि अपघात विम्याचे कवच लाभणार असून, तुरुंग प्रशासनाने इंडियन बँकेच्या सहकार्याने जनधन योजनेतहत कैद्यांचे बचत खाते उडण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेतहत या तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या शिक्षेच्या अवधीत कैद्यांना एक रुपयाचा अपघात विमा आणि ३० हजार रुपयांच्या आयुर्विमा संरक्षणाची सुविधा मिळेल. यावर्षी इंडियन बँकेच्या सहकार्याने ४,५०० कैद्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सोमवारपासून बँकेचे अधिकारी तुरुंग परिसरात या कामाची सुरुवात करणार आहोत, असे उपमहासंचालक (तुरुंग) मुकेश प्रसाद यांनी सांगितले.
ही मोहीम २२ डिसेंबरपासून सुरू करून डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा मानस आहे. सुरुवातीला आधारकार्डधारक कैद्यांचे खाते उघडणार आहोत. तुरुंग प्रशासनाने ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यानंतर आधारकार्ड नसलेल्यांना कैद्यांनाही ही सुविधा मिळेल. कैद्यांना नववर्षाची ही भेटच असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Insurance cover for Tihar prisoners