lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 2047 पर्यंत भारत सुपरपॉवर बनणार; प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न 10 लाख रुपये होणार...

2047 पर्यंत भारत सुपरपॉवर बनणार; प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न 10 लाख रुपये होणार...

भारताला विकसित बनवण्यासाठी निती आयोग एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:53 PM2023-10-30T14:53:42+5:302023-10-30T14:54:12+5:30

भारताला विकसित बनवण्यासाठी निती आयोग एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे.

India to become superpower by 2047; Every Indian's income will be Rs 10 lakh | 2047 पर्यंत भारत सुपरपॉवर बनणार; प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न 10 लाख रुपये होणार...

2047 पर्यंत भारत सुपरपॉवर बनणार; प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न 10 लाख रुपये होणार...

Indian Economy: गेल्या काही वर्षांपासून भारताचीअर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. जगभरातील अनेक मोठ्या देशांमध्ये भारताचेही नाव घेतले जात असून, लवकरच भारत विकसित देशांच्या यादीत येईल. अनेक मोठ्या अर्थतज्ज्ञांच्या मते भारत येत्या काही वर्षात 30 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनेल. NITI आयोगानुसार, 2047 पर्यंत भारत 30 ट्रिलियन रुपयांच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल.

सध्या $3.7 ट्रिलियन GDPसह भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 2030 पर्यंत भारत जापान आणि जर्मनीलाही मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे. रेटिंग एजन्सी S&P च्या मते, भारताचा GDP 2030 पर्यंत $7.3 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल. तर, NITI आयोग 2047 पर्यंत भारताला सुमारे 30 ट्रिलियन डॉलर्सची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे.

भारत 30 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनेल
NITI आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांनी अलीकडेच सांगितले होते की, 2047 पर्यंत भारताला सुमारे 30 ट्रिलियन डॉलर्सची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केले जात आहे. 2047 मधील व्हिजन इंडियाचा मसुदा डिसेंबर 2023 पर्यंत तयार होईल आणि पुढील तीन महिन्यांत सादर केला जाईल. त्यानंतर भारत देश त्यावर काम करण्यास सुरुवात करेल.

व्हिजन 2047 दस्तऐवजाचा उद्देश मध्यम उत्पन्न टाळणे हा आहे. NITI आयोगाच्या CEO च्या मते, आयोगाला मध्यम उत्पन्नाच्या सापळ्याची चिंता आहे. भारताला गरिबी आणि मध्यमवर्गीय उत्पन्नाचे जाळे फोडावे लागेल. तर, जागतिक बँकेच्या मते भारत 2047 मध्ये 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था गाठेल, तेव्हा प्रत्येक व्यक्ती 12,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेला देश बनेल. NITI आयोगाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, जर भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवायचे असेल, तर 2030 ते 2047 या काळात अर्थव्यवस्थेला वार्षिक 9 टक्के दराने वाढ करावी लागेल.

Web Title: India to become superpower by 2047; Every Indian's income will be Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.