lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > India China FaceOff: शाब्बास पठ्ठ्या! ‘या’ युवा व्यापारानं तोडला चिनी कंपनीसोबतचा कोट्यवधीचा करार

India China FaceOff: शाब्बास पठ्ठ्या! ‘या’ युवा व्यापारानं तोडला चिनी कंपनीसोबतचा कोट्यवधीचा करार

चीनसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे, याठिकाणी चिनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 08:27 AM2020-07-07T08:27:35+5:302020-07-07T08:29:23+5:30

चीनसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे, याठिकाणी चिनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात

India China FaceOff: young trader broke a multi-billion dollar deal with a Chinese company | India China FaceOff: शाब्बास पठ्ठ्या! ‘या’ युवा व्यापारानं तोडला चिनी कंपनीसोबतचा कोट्यवधीचा करार

India China FaceOff: शाब्बास पठ्ठ्या! ‘या’ युवा व्यापारानं तोडला चिनी कंपनीसोबतचा कोट्यवधीचा करार

Highlightsचीनच्या कुरापतींमुळे सामान्य नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात संताप हिमाचल प्रदेशातील युवा व्यापाराने तोडला चिनी कंपनीसोबतचा करार मेहरा कुटुंबाचा १९२५ पासून हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा व्यवसाय

मंडी – गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चीनविरोधातभारतीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले त्यानंतर चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीयांनी बॉयकोट चीन ही चळवळ सुरु केली, यात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याचा फटका चीनला बसला.

चीनसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे, याठिकाणी चिनी वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात, मात्र भारताशी वाद निर्माण करणे चीनसाठी आर्थिक तोट्याचं ठरत असताना दिसत आहे, यात सुरुवातीला भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अँप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. चीनच्या कुरापतींमुळे सामान्य नागरिकांपासून व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येक भारतीय राष्ट्रभावनेतून चीनविरोधात पाऊलं उचलत आहे. चीनशी सुरु असलेला वादावरुन मंडी जिल्ह्यातील नेरचौक येथील युवा व्यापारी अभिषेक मेहरा याने धाडसी पाऊल उचललं आहे. या स्थानिक व्यापाऱ्याने चिनी कंपनीसोबत असलेला साडे ४ कोटींचा व्यवहार तोडला आहे.

सीएल मेहरा नावाच्या मेहरा कुटुंब १९२५ पासून हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा व्यवसाय करतात. या कंपनीचे एमडी अभिषेक मेहरा मागील २० वर्षापासून चिनी कंपनीसोबत व्यवसाय करत आहेत. अभिषेक मेहरा यांनी या चिनी कंपनीसोबतचं व्यापारी करार तोडत कंपनीच्या दुकानांवर लावलेले हायर ग्लो साईन बोर्डही काढून टाकले आहेत.  याबाबत अभिषेक मेहरा यांनी सांगितले की, चीन सीमेवर भारतासोबत कुरापती करत आहे. त्यामुळे चीनसोबत असलेले सर्व प्रकारचे व्यापारी, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध तोडले पाहिजेत. चायनामधील हायर इंडिया कंपनीसोबत आमचा करार होता. ज्याची वर्षाला साडे चार कोटींची उलाढाल होती. याबाबत आम्ही कंपनीला पत्र पाठवलं आहे.

कंपनीने असा युक्तिवाद केला की ते भारतात काम करत आहेत आणि तसेच भारतात गुंतवणूक करत आहे. परंतु अभिषेक मेहरा म्हणाले की, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अद्याप चिनी आहेत आणि अशा परिस्थितीत जर आम्ही चिनी लोकांसोबत काम करत असू तर आमच्या भारतीय असण्याला काहीच अर्थ नाही. अभिषेक मेहरा यांनी कंपनीचे कागदपत्रे विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष लेखराज राणा, प्रांत विशेष संपर्क प्रमुख गोविंद ठाकूर आणि बाल्हचे आमदार इंद्रसिंग गांधी यांच्यासमोर दाखविली आणि चिनी कंपनीचे ग्लो साइन बोर्ड फेकून दिले.

Web Title: India China FaceOff: young trader broke a multi-billion dollar deal with a Chinese company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.