Lokmat Money > बिझनेस न्यूज > Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान

Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान

Hyundai IPO: देशातील दिग्गज कार कंपन्यांपैकी असलेली ही कंपनी आपला आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. ही कंपनी आपला भारतीय व्यवसाय शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आखत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:14 AM2024-05-25T11:14:58+5:302024-05-25T11:15:20+5:30

Hyundai IPO: देशातील दिग्गज कार कंपन्यांपैकी असलेली ही कंपनी आपला आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. ही कंपनी आपला भारतीय व्यवसाय शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आखत आहे.

Hyundai IPO The country s largest IPO listing plan to be brought by the giant car company | Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान

Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान

Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान

Hyundai IPO: वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ह्युंदाई मोटर आपला भारतीय व्यवसाय शेअर बाजारात लिस्ट करण्याची योजना आखत आहे. कंपनीनं या मेगा लिस्टिंगसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनली या इनव्हेस्टमेंट बँकांची निवड केली आहे. सिटी, जेपी मॉर्गन आणि एचएसबीसी सिक्युरिटीज या हायप्रोफाईल डीलमध्ये आधीपासूनच सामील होत्या.
 

हा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असेल. २.५ अब्ज ते ३ अब्ज डॉलर्स उभारण्याची कंपनीची योजना आहे. यापूर्वी एलआयसीचा आयपीओ मे २०२२ मध्ये आला होता, ज्यातून कंपनीनं २.७ अब्ज डॉलर्स उभे केले होते.
 

जुलैपर्यंत डीआरएचपी सादर करणार
 

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनली सामील झाले आहेत. जूनअखेर किंवा जुलैपर्यंत सेबीकडे डीआरएचपी (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. दरम्यान, आयपीओचं मूल्यांकन आणि त्याची साईज अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. हा इश्यू पूर्णपणे ओएफएस (ऑफर फॉर सेल) असण्याची शक्यता आहे.
 

भारतातील कंपनीचं स्थान
 

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ही कंपनी प्रवासी कार्सच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी होती. मारुती सुझुकीनंतर ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी होती. ह्युंदाई मोटर इंडियानं आर्थिक वर्ष २०२३ अखेर ६०,००० कोटी रुपयांचा महसूल आणि ४,६५३ कोटी रुपयांचा नफा कमावला.
 

ईटीने ५ फेब्रुवारी रोजी ह्युंदाईच्या भारतात लिस्टिंगच्या योजनेबद्दल सर्वप्रथम वृत्त दिलं होतं. ह्युंदाई मोटर कंपनीने ७ फेब्रुवारी रोजी कोरियन स्टॉक एक्स्चेंजला अधिकृत निवेदन जारी केलं. एक जागतिक कंपनी म्हणून कॉर्पोरेट मूल्य वाढविण्यासाठी परदेशी उपकंपन्यांच्या लिस्टिंगसह विविध उपक्रमांचा सातत्यानं आढावा घेत असल्याचं ह्युंदाईनं म्हटलं होतं.

Web Title: Hyundai IPO The country s largest IPO listing plan to be brought by the giant car company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.