lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > YouTube वर व्हिडीओ टाकून कशी होते कमाई? १००० व्ह्यूज वर किती मिळतो पैसा, पाहा गणित

YouTube वर व्हिडीओ टाकून कशी होते कमाई? १००० व्ह्यूज वर किती मिळतो पैसा, पाहा गणित

तर तुम्हीदेखील युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करून चांगले पैसे कमावू शकता. पण युट्युब तुमच्या व्हिडीओंसाठी किती पैसा देतं हे पाहू.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 02:42 PM2024-02-16T14:42:50+5:302024-02-16T14:43:10+5:30

तर तुम्हीदेखील युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करून चांगले पैसे कमावू शकता. पण युट्युब तुमच्या व्हिडीओंसाठी किती पैसा देतं हे पाहू.

How to make money by posting videos on YouTube How much money you get on 1000 views see the math | YouTube वर व्हिडीओ टाकून कशी होते कमाई? १००० व्ह्यूज वर किती मिळतो पैसा, पाहा गणित

YouTube वर व्हिडीओ टाकून कशी होते कमाई? १००० व्ह्यूज वर किती मिळतो पैसा, पाहा गणित

How to earn from YouTube Video: तुम्ही सुद्धा YouTube च्या माध्यमातून लाखो रुपये कमावण्याचा विचार करत आहात का? तुम्ही तुमचे व्हिडीओ देखील तयार करत आहात आणि ते YouTube वर पोस्ट करत आहात, इतकंच नाही तर त्याद्वारे पैसे कमवण्याचा विचार करत आहात? तर तुम्हीदेखील युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करून चांगले पैसे कमावू शकता. परंतु, तुम्हाला सुरुवातीला यासाठी काही मेहनत करावी लागेल. एकदा तुमचे युझर्स आणि व्ह्यूज वाढू लागले की, पैसे कमवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की किती व्ह्यूजसाठी तुम्हाला किती पैसे मिळू शकतील.
 

या गोष्टींकडे द्यावं लागेल लक्ष
 

तुम्हाला किती व्ह्यू आणि फॉलोअर्स आहेत यावर आधारित तुम्हाला पैसे मिळतात. व्हिडीओजच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावणारे अनेक YouTubers आहेत. इतके व्ह्यू पाहून पैसे मिळतील असं नाही. YouTube चे देखील स्वतःचे नियम आहेत. व्ह्यू आणि फॉलोअर्स व्यतिरिक्त जाहिराती किती महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊ.
 

केवळ ह्यू आल्यावर मिळत नाहीत पैसे
 

यूट्यूबवर केवळ व्हिडीओ अपलोड करून पैसे मिळत नाहीत. YouTube व्हिडीओंच्या व्ह्यूजमधून पैसे कमवत नाही. YouTube वर कमाई जाहिरातीद्वारे होते. YouTube वर व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी किंवा सुरू असताना जाहिराती दिसतात आणि YouTube त्यातून पैसे कमावतं. जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड केला आणि तुमचं अकाउंट गुगलच्या ॲडसेन्सशी लिंक असेल तर यूट्यूब त्यावर जाहिराती टाकेल. त्यानंतर प्रत्येक वेळी व्हिडीओ प्ले झाल्यावर जाहिरात दिसेल, ज्यामुळे YouTube देखील पैसे कमावते. त्यासाठी ते तुम्हाला पैसे देतात.
 

जाहिराती पाहण्यासाठी पैसे
 

समजा १०००० लोक तुमचा व्हिडीओ पाहतात परंतु कोणीही जाहिरात पाहत नाही आणि प्रत्येक वेळी स्किप बटणावर क्लिक केलं तर YouTube तुम्हाला पैसे देणार नाही. जर १ हजार लोकांनी तुमचा व्हिडीओ पाहिला आणि त्या सर्वांनी जाहिराती पाहिल्या, तर तुम्हाला त्यासाठी पैसे मिळतील. व्हिडीओवरील जाहिरात जितकी महाग असेल, तितके YouTube चॅनल अधिक कमाई करेल. सरासरी यातून किती पैसा मिळतात हे पाहू.
 

१००० व्ह्यूसाठी युट्यूब ४२ रुपये देतं. तर २ हजार व्ह्यूसाठी ८५ रुपये मिळतात. १० हजारांसाठी ३९० रुपये. १ लाख व्ह्यूसाठी ४३८२, १० लाख व्ह्यूसाठी ४२३५०, १ कोटी व्ह्यूसाठी ४.२१ लाख, १० कोटी व्ह्यूसाठी ४२.३३ लाख आणि १०० कोटी व्ह्यू साठी ४.२३ कोटी रुपये दिले जातात.

Web Title: How to make money by posting videos on YouTube How much money you get on 1000 views see the math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.