lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्टात बचत खातं कसं उघडाल, जाणून घ्या व्याजदर अन् करमुक्ती 

पोस्टात बचत खातं कसं उघडाल, जाणून घ्या व्याजदर अन् करमुक्ती 

भारतीय पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:30 PM2019-01-29T12:30:05+5:302019-01-29T12:32:37+5:30

भारतीय पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतं.

How to open a savings account in a post office, know interest rates and tax deduction | पोस्टात बचत खातं कसं उघडाल, जाणून घ्या व्याजदर अन् करमुक्ती 

पोस्टात बचत खातं कसं उघडाल, जाणून घ्या व्याजदर अन् करमुक्ती 

Highlightsग्राहकांना पत्र पोहोचवण्याव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस आपल्याला बँकिंग सेवाही पुरवते.या खात्यामधल्या पैशावर मिळालेल्या व्याजाच्या 10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर द्यावा लागत नाही. पोस्टात बचत खातं उघडण्यासाठी आपल्याला फक्त 20 रुपये खर्च करावे लागतात. 

नवी दिल्ली- भारतीय पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतं. ग्राहकांना पत्र पोहोचवण्याव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस आपल्याला बँकिंग सेवाही पुरवते. छोट्या छोट्या योजनांतर्गत आपल्याला पोस्टाच्या बचत खात्यामध्ये पैसे जमा करता येतात. पोस्ट ऑफिस आपल्या बचत खात्याच्या गुंतवणुकीवर वर्षाला 4 टक्के व्याज देतं. परंतु हा व्याजदर कमी आणि जास्त होत असतो. पोस्टाच्या वेबसाइटवरही यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे.

या खात्यामधल्या पैशावर मिळालेल्या व्याजाच्या 10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर द्यावा लागत नाही. पोस्टात बचत खातं उघडण्यासाठी आपल्याला फक्त 20 रुपये खर्च करावे लागतात. पोस्टातील बचत खातं हे रोख रकमेतूनच उघडता येते. ज्यावेळी आपण 500 रुपये देऊन खातं उघडता, तेव्हा आपल्याला पोस्ट ऑफिस धनादेशाची सुविधा उपलब्ध करून देते. तसेच कमीत कमी खात्यात 500 रुपये जमा करून ठेवावेच लागतात. तसेच आपल्याला धनादेश नको असल्यास कमीत कमी 50 रुपये जमा ठेवून खातं कार्यान्वित ठेवू शकतो.

तसेच पोस्टात खातं उघडतेवेळी किंवा उघडल्यानंतर आपल्याला नॉमिनीची सुविधाही पुरवली जाते. पोस्टातील बचत खात्याला एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरितही करता येते. एका पोस्टाच्या शाखेत एकच खातं उघडले जाते. पोस्ट ऑफिसचं बचत खातं अल्पवयीन मुलाच्या नावेही उघडता येते. जर अल्पवयीन मुलगा 10 वर्षं किंवा त्याहून जास्त वयाचा असेल आणि त्यानं दोन खाती उघडल्यास ती कार्यान्वित ठेवता येतात. सज्ञान झाल्यानंतर त्याला आधीचं खातं स्वतःच्या नावे करता येते. तसेच पोस्टात दोन जण मिळून संयुक्त खातंही उघडू शकतात. संयुक्त खात्याला एकेरी खात्यात आणि एकेरी खात्याचं संयुक्त खात्यामध्ये हस्तांतरित करता येते. तीन आर्थिक वर्षांत खात्यामधून एकदा पैसे काढणे आणि टाकण्याचे व्यवहार करावे लागतात, तरच ते खातं कार्यान्वित राहतं. तसेच पोस्टाच्या खात्यावर आता एटीएमची सुविधाही पुरवते.

आता ग्राहक घरबसल्या करू शकतो हे काम

  • ग्राहक आता इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सर्व कामे करू शकतात
  • यात 17 कोटी पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांना ऑनलाइन पैसे वळते करण्याची सुविधा मिळणार आहे. 
  • तसेच ग्राहक ऑनलाइन देवाण-घेवाणीचे व्यवहारही करू शकणार आहेत. 
  • इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आपण RD, TD, पीपीएफ खाती उघडू शकतो.  


कसं सुरू कराल रेकरिंग डिपॉझिट- आरडी खातं पोस्ट ऑफिस किंवा जाऊन उघडता येतं, तसेच आपण हे खातं ऑनलाइनही उघडू शकतो. पोस्टात आरडी उघडण्यासाठी तुम्हाला रोख रक्कम किंवा धनादेश द्यावा लागतो. तुमचं खातं एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्येही ट्रान्सफर करता येते. तसेच दोन जणांच्या नावे संयुक्त खातंही उघडता येते. आरडी खातं उघडण्यापूर्वी पहिल्यांदा कुठे जास्त व्याज मिळत ते पाहावे. जर आपल्याला आरडीवर 10 हजारांहून अधिक व्याज मिळत असेल तर त्यावर आपल्याला कर द्यावा लागू शकतो. पोस्ट खात्यातील 1 ते 5 वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला 6.9 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, आरडीवर 10 हजारपेक्षा अधिक वार्षिक व्याज मिळत असेल तर त्यासाठी ग्राहकांना टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना यावर कर बसेल. 

Web Title: How to open a savings account in a post office, know interest rates and tax deduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.