lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारचा सिंगापूर पॅटर्न, होणार 'या' संस्थेची स्थापना

बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारचा सिंगापूर पॅटर्न, होणार 'या' संस्थेची स्थापना

पुन्हा एकदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारसमोर वाढत्या बेरोजगारीमुळे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 09:23 AM2019-06-09T09:23:44+5:302019-06-09T09:24:26+5:30

पुन्हा एकदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारसमोर वाढत्या बेरोजगारीमुळे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.

Government's Singapore Pattern, to remove unemployment | बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारचा सिंगापूर पॅटर्न, होणार 'या' संस्थेची स्थापना

बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारचा सिंगापूर पॅटर्न, होणार 'या' संस्थेची स्थापना

लखनौ - पुन्हा एकदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारसमोर वाढत्या बेरोजगारीमुळे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. सद्यस्थितीत बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याची आकडेवारी समोर आल्याने सरकारवर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे बेरोगजारी दूर करण्यासाठी सरकारने गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी दोन कॅबिनेट कमिटींची स्थापना केली आहे. कौशल विकास मंत्रालयाच्या माध्यमातूनही बेरोजगारी दूर करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी सिंगापूरचे अनुकरण करत इंस्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग फॉर स्किल्स या संस्थेची मुंबईत स्थापना करण्यात येणार आहे. 

केंद्रीय कौशल विकास मंत्री महेंद्रनाथ पांडेय यांनी ही माहिती दिली आहे. पांडेय यांनी सांगितले की, ''सिंगापूरप्रमाणे मुंबईमध्ये  इंस्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग फॉर स्किल्सची स्थापना होणार आहे. यासाठी 250 कोटी रुपये इतका खर्च होईल. ही संस्था रोजगारपुरक कार्यक्रम हाती घेऊन तरुणांना रोजगार देण्यासाठी मदत करेल.''


 यावेळी उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीसाठीची भाजपाची तयारी पूर्ण झाली असल्याचेही महेंद्रनाथ पांडेय यांनी सांगितले. एसपी-बीएसपी आणि रालोद यांनी एकत्र निवडणूक लढवून पाहिली. आता त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून पाहावी, असा टोला त्यांनी लगावला. भाजपा विधानसभेच्या सर्व 12 जागांवर पोटनिवडणूक लढवणार आहे. आम्ही केवळ निवडणूक लढवणार नाही तर आपल्या जागांसोबतच सपा आणि बसपाच्या ताब्यात असलेल्या जागांवरही विजय मिळवू, असा दावाही महेंद्रनाथ पांडेय यांनी केला.  

Web Title: Government's Singapore Pattern, to remove unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.