lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूषखबर : 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची खास संधी, 'या' ठिकाणी झटपट करा रजिस्ट्रेशन

खूषखबर : 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची खास संधी, 'या' ठिकाणी झटपट करा रजिस्ट्रेशन

मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम म्हणाले, हे एक्सचेन्ज एक इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म बनेल. जेथे स्टेकहोल्डर्स व्हर्च्युअली एकमेकांना भेटू शकतील आणि पुढील रणनिती ठरवू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:40 PM2021-09-29T13:40:17+5:302021-09-29T13:41:33+5:30

मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम म्हणाले, हे एक्सचेन्ज एक इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म बनेल. जेथे स्टेकहोल्डर्स व्हर्च्युअली एकमेकांना भेटू शकतील आणि पुढील रणनिती ठरवू शकतात.

Good news Job for age 60 retired people, employment exchange for elderly from 1 october | खूषखबर : 60 ओलांडलेल्या निवृत्त लोकांसाठी नोकरीची खास संधी, 'या' ठिकाणी झटपट करा रजिस्ट्रेशन

प्रतिकात्मक फोटो.

Job for age 60 retired people, employment exchange for elderly from 1 octoberनवी दिल्ली -  निवृत्त लोकांसाठी पुन्हा एकदा नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. सरकारने अशा लोकांसाठी एक खास पोर्टल तयार केले आहे. यावर 1 ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज (employment exchange) आहे. या पोर्टलला SACRED (Senior Able Citizens for Re-Employment in Dignity) असे नाव देण्यात आले आहे. हे पोर्टल सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाने तयार केले आहे. (Job for age 60 retired people, employment exchange for elderly from 1 october)

60 वर्षांवरील लोक यावर नोंदणी करू शकतात आणि ते व्हर्च्युअल मॅचिंगच्या अधारे त्यांना रोजगाराची संधी देईल. मंत्रालयाचे सचिव आर सुब्रमण्यम म्हणाले, हे एक्सचेन्ज एक इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म बनेल. जेथे स्टेकहोल्डर्स व्हर्च्युअली एकमेकांना भेटू शकतील आणि पुढील रणनिती ठरवू शकतात. एम्पलॉयर्सना एक्सचेन्जवर आणण्यासाठी मंत्रालयाने सीआयआय, फिक्की आणि असोचॅम आणि इतरही काही संस्थांना पत्र लिहिले आहे.

अशी मिळेल नोकरी
हे पोर्टल लाईव्ह झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक त्यात नोंदणी करू शकतात. यासाठी त्यांना त्यांचे शिक्षण, अनुभव, कौशल्य यांची माहिती द्यावी लागेल. तसेच, ते कोणत्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहेत हेही त्यांना सांगावे लागेल. याशिवाय जॉब प्रोव्हायडरला कामाचा प्रकार आणि ते पूर्ण करण्यासाठी किती लोकांची आवश्यकता आहे, हे सांगावे लागेल. एवढेच नाही, तर या कामात ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाईल. तथापि, एक्सचेन्ज म्हणजे नोकरीची हमी नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Read in English

Web Title: Good news Job for age 60 retired people, employment exchange for elderly from 1 october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.