lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > खुशखबर! सराफा बाजारात चांदी ₹5845 स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

खुशखबर! सराफा बाजारात चांदी ₹5845 स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

आयबीजेएने जारी केलेल्या किंमतीनुसार, सराफा बाजारात 4 डिसेंबर 2023 रोजी सोने ऑल टाईम हाई अर्थात 63805 रुपयांवर होते. या किंमतीच्या तुलनेत सोने अद्यापही 1415 रुपयांनी स्वस्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 06:04 PM2024-01-22T18:04:18+5:302024-01-22T18:04:53+5:30

आयबीजेएने जारी केलेल्या किंमतीनुसार, सराफा बाजारात 4 डिसेंबर 2023 रोजी सोने ऑल टाईम हाई अर्थात 63805 रुपयांवर होते. या किंमतीच्या तुलनेत सोने अद्यापही 1415 रुपयांनी स्वस्त आहे.

Good news gold cheaper by rs 1415 and silver by rs 5845 in bullion markets Check the latest rate frequently | खुशखबर! सराफा बाजारात चांदी ₹5845 स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

खुशखबर! सराफा बाजारात चांदी ₹5845 स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

सोने आणि चांदीच्या दरात या वर्षी मोठी घसरण झाली आहे. 29 डिसेंबर 2023 रोजीच्या बंद भावाच्या तुलनेत सोने 856 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे, तर चांदीच्या किंमतीतही 2167 रुपये प्रति किलोची घसरण नोंदवली गेली आहे. आयबीजेएने जारी केलेल्या किंमतीनुसार, सराफा बाजारात 4 डिसेंबर 2023 रोजी सोने ऑल टाईम हाई अर्थात 63805 रुपयांवर होते. या किंमतीच्या तुलनेत सोने अद्यापही 1415 रुपयांनी स्वस्त आहे.

सराफा बाजारात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 62390 रुपयांवर बंद झाला, तर चांदी 71228 रुपयांवर. 23 कॅरेट गोल्डच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, हे 62140 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 57149 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे 18 कॅरेट सोन्याचा भाव 46793 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 36498 रुपयांवर होता.

चांदी 5845 रुपयांनी स्वस्त - 
4 डिसेंबर 2023 रोजी 24 कॅरेट सोने 63805 रुपयांवर खुले होऊन 63281 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदी 77073 रुपये प्रति किलो दराने खुली होऊन 76430 रुपयांवर बंद झाली होती. 4 डिसेंबरच्या खुल्या किंमतीच्या तुलनेत आता सोने 1415 रुपये तर चांदी 5845 रुपये स्वस्त आहे.

सोने आणि चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनने (IBJA) जारी केले आहेत. आयबीजेएच्या दरानुसार, दिल्ली, मुंबई, गोरखपूर, लखनऊ, जयपूर, इंदूर पाटणासह सोन्या-चांदीच्या सरासरी दरात घट झाली आहे. या रेटवर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्ज लागलेला नाही. आपल्या शरहात हे भाव काही प्रणात कमी अधिक असू शकतात.

Web Title: Good news gold cheaper by rs 1415 and silver by rs 5845 in bullion markets Check the latest rate frequently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.