lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजाराच्या तेजीने सोन्यालाही 'झळाळी', गाठली नवी उंची; चांदीचाही भाव वधारला

शेअर बाजाराच्या तेजीने सोन्यालाही 'झळाळी', गाठली नवी उंची; चांदीचाही भाव वधारला

निवडणुकीच्या निकालानंतर सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'जोमात'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 02:21 PM2023-12-05T14:21:09+5:302023-12-05T14:22:01+5:30

निवडणुकीच्या निकालानंतर सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'जोमात'

gold silver price today 5 December 2023 gold prices reached record high latest rate | शेअर बाजाराच्या तेजीने सोन्यालाही 'झळाळी', गाठली नवी उंची; चांदीचाही भाव वधारला

शेअर बाजाराच्या तेजीने सोन्यालाही 'झळाळी', गाठली नवी उंची; चांदीचाही भाव वधारला

Gold Silver Price: पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल रविवारी आणि सोमवारी लागले. त्यात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने पाच पैकी ३ राज्यात सत्ता मिळवली. एका राज्यात काँग्रेसला तर एका राज्यात स्थानिक पक्षाला विजय मिळवता आला. भाजपाच्या विजयानंतर सोमवारी शेअरबाजारात तेजी दिसून आली होती. ही तेजी मंगळवारीही कायम राहिली. मंगळवारी सकाळी जागतिक सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसली. Comex वर सध्या सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत 0.44 टक्के किंवा $9.00 च्या वाढीसह $2051.20 प्रति औंस वर व्यापार करताना दिसत आहे. त्याच वेळी, सोन्याची जागतिक स्पॉट किंमत सध्या प्रति औंस $ 2032.21 इतकी असल्याचे दिसत आहे.

तज्ज्ञांच्या मते, पूर्वी 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली असलेले सोने आता सतत वाढत आहे. सोन्याचा भाव येत्या काळात 64 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा स्तर ओलांडू शकतो. सणासुदीमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी, MCX एक्सचेंजवर 4 फेब्रुवारी 2024 रोजी डिलिव्हरीसाठी असलेले सोने 62,826 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढीसह उघडले. गेल्या सोमवारी सोने 62,369 रुपयांवर बंद झाले होते. तर 5 एप्रिल 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने आज 63,068 रुपयांच्या वाढीसह उघडले.

सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोने नवीन उंची गाठत आहे. सोमवारी एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव 63,490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. कालच्या व्यवहारादरम्यान तो 64,063 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावरही पोहोचला होता.

चांदीची किंमत काय आहे?

सोन्याबरोबरच मंगळवारी सकाळी चांदीच्या जागतिक किमतीतही वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर, चांदीचे वायदे बाजारात 0.11 टक्के किंवा 0.03 डॉलरच्या वाढीसह $ 24.94 प्रति औंसवर व्यवहार करताना दिसली. त्याच वेळी, चांदीची जागतिक स्पॉट किंमत 22.62 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली. सोमवारी सकाळी, 5 मार्च 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी MCX एक्सचेंजमध्ये 76,264 रुपये प्रति किलो घसरून उघडली. तर 3 मे 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदी आज 77,386 रुपयांच्या पातळीवर उघडली.

Web Title: gold silver price today 5 December 2023 gold prices reached record high latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.