lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जागतिक तणावादरम्यान सोन्याने गाठला नवा उच्चांक, किंमत 73750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

जागतिक तणावादरम्यान सोन्याने गाठला नवा उच्चांक, किंमत 73750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

Gold Rate: इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान सोन्या-चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 09:59 PM2024-04-16T21:59:45+5:302024-04-16T22:00:47+5:30

Gold Rate: इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान सोन्या-चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला.

Gold Rate: Gold hits new high at Rs 73750 per 10 grams amid global tensions | जागतिक तणावादरम्यान सोन्याने गाठला नवा उच्चांक, किंमत 73750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

जागतिक तणावादरम्यान सोन्याने गाठला नवा उच्चांक, किंमत 73750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

Gold Prices Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढत होत आहे. आता जागतिक तणावामुळे सोन्याचे दर आणखी वाढत आहेत. मंगळवार(16 एप्रिल 2024) दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅम, या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. यापूर्वी, 12 एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 73,300 रुपयांचा विक्रमी उच्चांकावर होता.

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान मजबूत जागतिक संकेतांमुळे सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठलाय. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दिल्ली एनसीआरमध्ये सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. तर, सोमवारी सोन्याचा भाव 73,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भावही 800 रुपयांनी वाढून 86,500 रुपये प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.

सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाल्याबद्दल, एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्च ॲनालिस्ट सौमिल गांधी म्हणाले की, परदेशी बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे दिल्लीच्या बाजारात सोन्याची किंमत 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार कॉमेक्समध्ये सोने प्रति औंस $2,370 वर व्यवहार करत आहे, जे मागील किमतीपेक्षा $15 अधिक आहे.

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. जागतिक गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सने आपल्या संशोधन अहवालात म्हटले की, चालू वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 2700 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. याचाच अर्थ येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Gold Rate: Gold hits new high at Rs 73750 per 10 grams amid global tensions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.