Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचा भाव तेजीत; 170 रुपयांची वाढ

सोन्याचा भाव तेजीत; 170 रुपयांची वाढ

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी सोन्याचा भाव पुन्हा तेजीत राहिला.

By admin | Updated: December 10, 2014 02:25 IST2014-12-10T02:25:51+5:302014-12-10T02:25:51+5:30

सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी सोन्याचा भाव पुन्हा तेजीत राहिला.

Gold prices up; 170 per cent increase | सोन्याचा भाव तेजीत; 170 रुपयांची वाढ

सोन्याचा भाव तेजीत; 170 रुपयांची वाढ

नवी दिल्ली : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी सोन्याचा भाव पुन्हा तेजीत राहिला. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 170 रुपयांनी वधारुन 26,82क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. लग्नसराईच्या काळातली ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापा:यांनी खरेदी केली. चांदीचा भावही 15क् रुपयांच्या तेजीसह 36,8क्क् रुपये प्रतिकिलो राहिला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, लग्नसराईची मागणी व जागतिक बाजारातील तेजीमुळे सोन्याचा भाव सावरला. पर्यायी गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या शेअर बाजारातही घसरणीचा कल राहिल्यानेही सराफ्यात तेजी नोंदली गेली आहे.
सिंगापुरात सोन्याचा भाव 1,2क्3.51 वरुन 1,2क्3.77 डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव क्.4 टक्क्याने वधारुन 16.42 डॉलर प्रतिऔंस राहिला. तयार चांदीचा भाव 15क् रुपयांच्या सुधारणोसह 36,8क्क् रुपये व चांदी साप्ताहिक डिलीव्हरीचा भाव 175 रुपयांनी वाढून 36,8क्क् रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 62,क्क्क् रुपये व विक्रीकरता 63,क्क्क् रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्राजधानी दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 17क् रुपयांनी वाढून 26,82क् व 26,62क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. गेल्या तीन सत्रंत यात 25क् रुपयांची घट नोंदली गेली आहे. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादीत व्यवहारामुळे 23,7क्क् रुपयांवर कायम राहिला.

 

Web Title: Gold prices up; 170 per cent increase