lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price History: केवळ १११ रुपयांना मिळायचं १० ग्राम सोनं, आज किंमत ६३००० पार; पाहा कसा वाढत गेला भाव

Gold Price History: केवळ १११ रुपयांना मिळायचं १० ग्राम सोनं, आज किंमत ६३००० पार; पाहा कसा वाढत गेला भाव

गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:04 PM2023-05-23T20:04:53+5:302023-05-23T20:05:18+5:30

गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

Gold Price History 10 grams of gold was available for only Rs 111 today price is Rs 63000 See how the price has increased | Gold Price History: केवळ १११ रुपयांना मिळायचं १० ग्राम सोनं, आज किंमत ६३००० पार; पाहा कसा वाढत गेला भाव

Gold Price History: केवळ १११ रुपयांना मिळायचं १० ग्राम सोनं, आज किंमत ६३००० पार; पाहा कसा वाढत गेला भाव

गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट हे त्यामागील प्रमुख कारण आहे. अमेरिकेत एकापाठोपाठ एक बँका बंद पडल्यानं संपूर्ण जागतिक बाजारपेठेत आर्थिक मंदीची भीती आणखीनच वाढलीये. मंदीच्या भीतीनं शेअर बाजारावर भीतीचं सावट आहे. याच संकटकाळात सोन्याच्या किंमतीला सपोर्ट मिळाला आणि त्याच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या.

जेव्हा आर्थिक संकट येतं तेव्हा जगभरातील मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करण्यास सुरुवात करतात. यावेळीही असंच काहीसं घडलंय. एक काळ असा होता जेव्हा भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत फक्त 111 रुपये होती. मात्र आज सोन्याच्या भावानं 60 हजार रुपयांचा आकडा पार केलाय.

६३ वर्षांत असे वाढले दर

1960 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 111 रुपये होती. त्यानंतर सातत्यानं सोन्याच्या दरात तेजी येत गेली. पाहा कसे वाढत गेले दर...

1960

10 ग्राम

111 रुपये

1970

10 ग्राम 

184 रुपये

198010 ग्राम 

1330 रुपये

199010 ग्राम 

3200 रुपये

200010 ग्राम 

4400 रुपये

200510 ग्राम 

7000 रुपये

201010 ग्राम 

18500 रुपये

201510 ग्राम 

26343 रुपये

202010 ग्राम 

48615 रुपये

202210 ग्राम 

59300 रुपये

202310 ग्राम 

63185 रुपये

का वाढल्या किंमती?

सध्या सोन्याच्या दरात झालेल्या वाढीचं कारण अमेरिका आणि इतर देशांमध्ये बँकिंग संकट, कमकुवत डॉलर, सेफ हेवन डिमांड आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेची परिस्थिती असल्याचं बाजारातील जाणकारांचं म्हणणं आहे. जागतिक शेअर बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. चलनातील कमजोरीमुळे मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियादेखील तेच करत आहे.

स्वातंत्र्याच्या वेळी किंमत किती?

इंडियन पोस्ट गोल्ड कॉइन सर्व्हिसेसकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याची किंमत 88.62 रुपये होती. यानंतर सोन्याचे भाव झपाट्याने वाढू लागले.

दरम्यान, जागतिक स्तरावर झालेल्या घसरणींनंतर दिल्लीतील सर्राफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 350 रुपयांची घसरण झाली. यानंतर सोन्याचे दर 60170 रुपये प्रति 10 ग्राम झाले. गेल्या कामकाजाच्या सत्रात सोन्याचे दर 60520 रुपयांवर बंद झाले होते.

Web Title: Gold Price History 10 grams of gold was available for only Rs 111 today price is Rs 63000 See how the price has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.